Mallikarjun khargeकाळा पैसा, नोकरी ते MSP;मोदींनी एक तरी गॅरंटी पूर्ण केलीहे ही वाचा राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच महाविकास आघाडी व महायुती म्हणून होत आहेत. त्यामुळे, यंदा जागावाटपात मोठा क्लिष्ट पाहायला मिळाला. तर, एकच जागा असल्याने विधानसभा मतदारसंघातील अनेक इच्छुकांची नाराजी झाली. त्यामुळे, राज्यातील बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झाल्याचं दिसून आलं. पण, बंडखोरीनंतरही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला आहे.अनेक बंडखोरांची तलवार मान्य करण्यात पक्षाला यश आलं. मात्र, काही इच्छुकांनी अखेरपर्यंत बंडखोरी कायम ठेवली तर काहींनी पक्षांतर केले. त्यामध्ये, केज (kej) विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangita Thombare) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते. आता, संगीत ठोंबरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाती तुतारी घेतली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचं टेन्शन वाढलं आहे.