KL Rahul : भारतीय टी20 संघात केएल राहुल कायम राहणार? काय सांगतेय यंदाची आकडेवारी?
T20 Team India : केएल राहुल सध्या खराब फॉर्मात असल्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आता भविष्यात तो टी20 संघात असेल का?यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
KL Rahul in T20 Team India : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेमधील प्रवास संपुष्टात आला आहे. उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंड संघाने दणदणीत पराभूत करून स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये भारताचा सलामीवीर केएल राहुलच्या खराब फॉर्मची फारच चर्चा होती. त्यामुळे भविष्यात भारतीय टी20 संघातील त्याच्या स्थानाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. राहुलच्या खराब फलंदाजीमुळे अनेकदा भारतीय संघासमोर अडचणी निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता राहुलची जागा खरोखरच संघात आहे का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्या सध्याच्या फॉर्ममसह यंदाच्या टी20 सामन्यांतील कामगिरी पाहावी लागेल.
या वर्षातील टी-20 आंतरराष्ट्रीय मधील राहुलच्या कामगिरीवर नजर टाकली तर ती खूपच निराशाजनक आहे. सलामीवीर म्हणून खेळत असलेल्या राहुलचा स्ट्राइक रेट 126.53 आहे जो टी20 सारख्या झटपट क्रिकेटसाठी अजिबात चांगला नाही. राहुलने यावर्षी 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 434 धावा झाल्या आहेत. या वर्षात त्याच्या बॅटमधून सहा अर्धशतके झळकली असली तरी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याने अनेकदा संघाला निराश केलं आहे. राहुल ज्या पद्धतीने सलामी करताना फलंदाजी करतो, त्यामुळे दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजावर देखील दबाव सतत वाढत जातो. टी-20 क्रिकेटमध्ये अशीच फलंदाजी करत राहिल्यास संघाला निश्चितच नुकसान सहन करावे लागेल. सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर राहुलची जागा आता टी-20 संघात नसल्याचचं दिसून येत आहे. भारताला टी-20 मध्ये दमदार आणि स्फोटक फलंदाजी करणाऱ्या सलामीवीराची गरज आहे.
वर्ल्ड कप 2022 मध्ये केएल राहुल फेल
आयपीएलमध्ये गोलंदाजांचा समाचार घेणारा भारताचा सलामीवीर के एल राहुलला टी-20 विश्वचषकात काही खास कामगिरी करता आली नाही. सुपर 12 फेरीत बांग्लादेश आणि झिब्बाव्बेविरुद्ध सामन्यात त्यानं अर्धशतकं झळकावली. पण इतर सामन्यात त्याची बॅट शांतच दिसली. या स्पर्धेत राहुलनं सहा सामन्यात अवघ्या 128 धावा केल्या. तो पाकिस्तान विरुद्ध चार धावा, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 9 धावा आणि इंग्लंडविरुद्ध सामन्यात फक्त 5 धावा करून बाद झाला.
हे देखील वाचा-