एक्स्प्लोर

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर, टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 8 मार्चला गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जाऊन पाहायचं तुमचं नियोजन असेल तर एक चांगली संधी आहे. 

भारत इंग्लंड सामन्याचं तिकीट कुठं मिळणार?

टी 20 वर्ल्ड कपच्या सामन्यांची तिकीटं बुक माय शो या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. अतिरिक्त तिकीटांची विक्री करण्यात येणार असल्याचं बुक माय शोकडून सांगण्यात आलं आहे. आज सायंकाळी 6 वाजता ही विक्री सुरु होईल. बुक माय शोच्या वेबसाईटवरील माहितीनुसार एका तिकिटाची किंमत 1000 रुपये असेल. ज्या चाहत्यांना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जाऊन उपांत्य फेरीतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाहायला असेल ते बुक माय शोच्या वेबसाईटला भेट देऊन तिकीट बुक करु शकतात. 

बुक माय शोची पोस्ट

भारताच्या संघातील काही खेळाडूंनी आज मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात ज्यांना संधी दिली त्यांच्यासह मैदानात उतरणार की संघात काही बदल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

भारत की इंग्लंड कोण वरचढ?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड 5 वेळा आमने सामने आले आहेत.भारतानं तीनवेळा विजय मिळवला तर इंग्लंडनं दोन वेळा विजय मिळवला. पाच पैकी 2 वेळा भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत आमने सामने आले. इंग्लंडनं 2022 मध्ये भारताला 10 विकेटनं पराभूत केलं. तर 2024 मध्ये भारतानं उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केलं.त्या विजयासह भारतानं बदला पूर्ण केला होता.  

टी20 मध्ये हेड टू हेड

आंतर्राष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड 29 वेळा आमने सामने आले आहेत. भारताने 17 वेळा विजय मिळवला तर इंग्लंडने 12 वेळा विजय मिळवला आहे.  2026 टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांची कामगिरी सारखीच राहिली आहे. दोन्ही संघानी 7- 7 सामने खेळले आहेत.  यात दोन्ही संघांचा एकदा पराभव झाला आहे. भारत ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या स्थानावर होता. तर, इंग्लंड सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये पहिल्या स्थानावर होता.  दोन्ही संघांची कामगिरी सारखीच दिसत असली तरी जुनी आकडेवारी भारताच्या बाजूने आहे.

भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget