एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रणजीचा रणसंग्राम : दुसऱ्या साखळी लढतीत विदर्भ, महाराष्ट्राची दमदार सुरुवात
रणजी करंडकाच्या दुसऱ्या फेरीला आजपासून सुरुवात.
मुंबई : रणजी करंडकाच्या दुसऱ्या फेरीला आजपासून सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीत आज पहिल्याच दिवशी विदर्भ आणि महाराष्ट्रानं वर्चस्व गाजवलं.
विदर्भाच्या फलंदाजांचा दबदबा
कर्णधार फैझ फझलच्या दमदार शतकाच्या जोरावर विदर्भानं राजस्थानविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 288 धावांची मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या विदर्भाला सुरुवातीच्या दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. सलामीचा संजय रामस्वामी अवध्या दोन धावा काढून तंबूत परतला. पण त्यानंतर फैझ फझलनं अनुभवी वासिम जाफरच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी उभारली. जाफर आठ चौकारांसह 60 धावांचं योगदान दिलं. जाफरनंतर फलंदाजीला आलेला गेल्या सामन्यातला द्विशतकवीर गणेश सतीशनही फैझला उत्तम साथ देताना 43 धावांची खेळी उभारली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी आणखी 109 धावांची भर घातली. सतीशनं 43 धावांची खेळी केली.
कर्णधार फैझ फझलचा शतकी नजराणा
विदर्भाचा कर्णधार फैझ फझलनं या सामन्यात सलामीला येत 137 धावांची खेळी साकारली. फैझचं प्रथम श्रेणी कारकीर्दीतलं हे विसावं शतक ठरलं. त्यानं आपल्या खेळीत 267 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार आणि एक षटकार लगावला.
महाराष्ट्राच्या अनुपम संकलेचाची कमाल
पहिल्या सामन्यात हरयाणाविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रानं जम्मू काश्मिरविरुद्ध झोकात कमबॅक केलं. वेगवान गोलंदाज अनुपम संकलेचा, दिग्विजय देशमुख मुकेश चौधरी आणि डावखुऱ्या सत्यजित बच्छावसमोर जम्मू काश्मिरच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. त्यामुळे जम्मूचा पहिला डाव अवघ्या 209 धावांत आटोपला.
अनुपम संकलेचानं 56 धावांत सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर देशमुख, चौधरी आणि सत्यजित बच्छावनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्रानं तीन बाद 51 अशी मजल मारली होती.
संबंधित बातम्या -
एमआयजी क्लबला यंदाच्या पोलीस शिल्डचा मान
भारताचे 'हे' दोन खेळाडू माझा 400 धावांचा विक्रम मोडू शकतात : लारा
रवींद्र जाडेजाला रनआऊट दिल्याने विराट कोहली पंचांवर नाराज
MIG | एमआयजी क्लबला यंदाच्या पोलीस शिल्डचा मान I ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement