एक्स्प्लोर
एमआयजी क्लबला यंदाच्या पोलीस शिल्डचा मान
एमआयजीची अंतिम सामन्यात पार्कोफिन क्रिकेटर्सवर मात
मुंबई : गौरव जठारच्या नाबाद शतकाच्या जोरावर एमआयजी क्लबनं यंदाच्या पोलीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. या सामन्यात एमआयजीनं पार्कोफिन क्रिकेटर्सचा पहिल्या डावातल्या आघाडीवर पराभव केला. पोलीस शिल्ड स्पर्धेचं यंदाचं हे 72वं वर्ष होतं.
जय बिस्ताच्या 196 धावांच्या खेळीमुळे पार्कोफिननं पहिल्या डावात 358 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर गौरव जठारनं 19 चौकारांसह नाबाद 153 धावांची खेळी उभारुन एमआयजीला पहिल्या डावात सहा बाद 378 धावांची मजल मारुन दिली. पार्कोफिननं आपला दुसरा डाव सात बाद 173 धावांवर घोषित करुन एमआयजीला 154 धावांचं आव्हान दिलं. पण एमआयजीला तिसऱ्या दिवसअखेर सात बाद 139 धावाच करता आल्या. मात्र, एमआयजीनं पहिल्या डावात घेतलेली 20 धावांची आघाडी निर्णायक ठरली. याच आघाडीच्या जोरावर एमआयजीनं विजेतेपद पटकावलं.
यावेळी टीम इंडियाचा माजी कसोटीवीर झहीर खानच्या हस्ते विजेत्या/उपविजेत्या संघाला आणि स्पर्धेतल्या उत्कृष्ट खेळाडूंना गौरवण्यात आलं. गौरवण्यात आलं.
संक्षिप्त धावफलक -
पार्कोफिन- 358/8 & 173/8 dec
एमआयजी- 378/6 & 139/7
विजेते - एमआयजी क्रिकेट क्लब
उपविजेते - पार्कोफिन क्रिकेटर्स
मालिकावीर - सागर मिश्रा (पार्कोफिन क्रिकेटर्स)
20 विकेट्स, 161 धावा
उत्कृष्ट फलंदाज - कौशिक चिखलीकर (एमसीए कोल्ट्स)
355 धावा
उत्कृष्ट गोलंदाज - प्रदीप साहू (पार्कोफिन क्रिकेटर्स)
17 विकेट्स
अंतिम सामन्यातील उत्कृष्ट फलंदाज - जय बिस्ता (पार्कोफिन क्रिकेटर्स)
196 धावा
अंतिम सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज - निखिल दाते (एमआयजी)
5 विकेट्स
अंतिम सामन्यातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - विक्रांत औटी (पार्कोफिन क्रिकेटर्स)
स्पर्धेतला उदयोन्मुख खेळाडू - शीश शेट्टी (एमआयजी)
MIG | एमआयजी क्लबला यंदाच्या पोलीस शिल्डचा मान I ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement