अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे.या विजयात अक्षर पटेलच्या दोन अफलातून झेलचा (Catches) मोलाचा वाटा राहिला.
Axar Patel T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयात अक्षर पटेलच्या दोन अफलातून झेलचा (Catches) मोलाचा वाटा राहिला. पहिल्यांदा त्याने हॅरी ब्रूकचा धावत जाऊन मागे झुकत एक कठीण झेल टिपला, तर त्यानंतर सीमारेषेवर विल जॅक्सचा झेल पकडून स्वतःचा तोल सावरत चेंडू हवेत फेकला, जो शिवम दुबेने पूर्ण केला. अक्षरच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकचा अक्षर पटेलने जबदस्त असा कॅच पकडला आहे. या कॅचबाबत बोलताना अक्षर पटेल म्हणाला की, हॅरी ब्रूकचा घेतलेला कॅच माझ्यासाठी फेवरेट होता. मी तो कॅच पकडण्यासाठी उलटा पळत होतो. लकीली मी त्याठिकाणी थांबलो. ज्यावेळी तुम्ही कॅच घेण्यासाठी उलटे पळत असता, त्यावेळी तो कॅच पकडणे तुमच्यासाठी कठीण असते. त्यावेळचा क्षण तुमच्यासाठी मजेशीर असतो असे अक्षर पटेल म्हणाला.
भाररत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने 253 धावांचा डोंगर उभारला होता. सेमी फायनलमध्ये भारतीय फलंदाजांनी आपली भूमिका योग्यरित्या पार पाडली. त्यानंतर गोलंदाजांवर धावांचा बचाव करण्याची जबाबदारी होती. इंग्लंडच्या फलंदाजांनीही तुफान फटकेबाजी केली. भारतीय संघातील क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नसती, तर हा सामना जिंकणं कठीण होतं. यादरम्यान भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने 2 भन्नाट झेल घेतले. एकीकडे इंग्लंडच्या खेळाडूंकडून सोपे झेल सुटले, तर दुसरीकडे अक्षर पटेलने असे काही झेल टिपले जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अक्षर पटेलने मागच्या दिशेने धावत जाऊन हॅरी ब्रुकचा भन्नाट झेल घेतला.
विल जॅक्सचा कॅच पकडण्यासाठी अक्षर पटेलने जवळपास 20 ते 30 मीटरपर्यंत वेगाने धाव घेतली
विल जॅक्सचा कॅच पकडण्यासाठी अक्षर पटेलने जवळपास 20 ते 30 मीटरपर्यंत वेगाने धाव घेतली. चेंडू पकडताना तो बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ पोहोचला. मात्र चपळाई दाखवत त्यांनी योग्य वेळी चेंडू शिवम दुबेकडे हवेत फेकला. या कॅचनंतर स्टेडियममधील चाहत्यांनी जल्लोष केला. या सामन्यात अक्षर पटेलने एकूण दोन कॅच घेतले आणि एक विकेटही मिळवली. त्याने तीन षटके टाकत 25 धावा देत 1 विकेट घेतली. मात्र विल जॅक्सचा घेतलेला तो कॅचच सामन्याचा निर्णायक टर्निंग पॉइंट ठरला.
या शानदार विजयासह भारताने टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (4 वेळा) अंतिम फेरीत पोहोचणारा संघ बनण्याचा मान पटकावला आहे. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार असून, चाहत्यांना एका थरारक लढतीची उत्सुकता लागली आहे.



















