Ind vs Nz T20 World Cup 2026 Final Ticket : भारत-न्यूझीलंड महामुकाबला! नरेंद्र मोदी स्टेडियमचं 3,000 ते 75,000 तिकीट दर, ऑनलाइन बुकिंग कशी करायची?, A टू Z माहिती
T20 World Cup 2026 Final Ticket Update : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

T20 World Cup 2026 Final Ticket Update : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्याच्या तिकीटांपासून ते बुकिंग आणि स्टेडियममध्ये प्रवेशाच्या नियमांपर्यंत चाहत्यांमध्ये प्रचंड पाहायला मिळत आहे.
𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐚𝐰𝐚𝐢𝐭𝐬 ⏳
— ICC (@ICC) March 5, 2026
India and New Zealand will chase ultimate glory in the #T20WorldCup Final 🏆 pic.twitter.com/L1iPOTLfbX
तिकीट कसे बुक करायचे?
अंतिम सामन्याची तिकिटे अधिकृतपणे BookMyShow आणि आयसीसीच्या पोर्टलवरून विकली जात आहेत. तिकीटांची प्रचंड मागणी असल्यामुळे सध्या बहुतांश कॅटेगरी “सोल्ड आउट” झाल्या आहेत. मात्र क्रिकेटप्रेमींसाठी अजूनही आशा कायम आहे.
सामान्यतः मोठ्या सामन्यांपूर्वी 24 ते 48 तास आधी काही तिकिटे पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. मुंबईत झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही असेच पाहायला मिळाले होते. त्यामुळे ज्यांना अद्याप तिकीट मिळालेले नाही, त्यांनी अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
तिकीटांची किंमत किती?
तिकीटांच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर स्टेडियममधील वरच्या स्टँडसाठी सुरुवातीची किंमत सुमारे 3,000 रुपयांपासून सुरू होते. तर प्रीमियम हॉस्पिटॅलिटी आणि क्लब लाउंज सीट्ससाठी सुमारे 50 हजार ते 75 हजार रुपयांपर्यंत किंमत आहे.
स्टेडियममध्ये प्रवेशाचे कडक नियम
अंतिम सामन्यासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेडियमचे गेट्स सायंकाळी 3:30 वाजल्यापासून उघडले जातील, तर सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. त्यामुळे प्रेक्षकांनी किमान 3 तास आधी स्टेडियमवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून सुरक्षा तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळेल.
स्टेडियममध्ये अनेक वस्तू नेण्यास मनाई असेल. पावर बँक, बॅग, पाण्याच्या बाटल्या आणि छत्री यांसारख्या वस्तूंवर पूर्ण बंदी असेल. प्रेक्षकांना फक्त मोबाईल फोन आणि वॉलेटच आत घेऊन जाण्याची परवानगी दिली जाईल.
सामना पाहण्यासाठी महत्त्वाची माहिती
अहमदाबादच्या मोटेरा परिसरात असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे. येथे सुमारे 1.3 लाख प्रेक्षक बसू शकतात. मोठ्या गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डिजिटल तिकीट आधीच डाउनलोड करून ऑफलाइन सेव करून ठेवणे आवश्यक आहे.
हे ही वाचा -




















