नीरजनं रौप्य जिंकलं; पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पदकांचा दुष्काळ संपवला, सुवर्ण जिंकत रचला इतिहास
Arshad Nadeem Won Gold Medal : पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नांत 92.97 मीटरवर भालाफेकला. शेवटच्या फेरीत त्यानं 91.7 मीटर अंतरावर भालाफेक केली. पहिल्या फेरीत त्यानं फाऊल केलं असलं, तरी तिसऱ्या फेरीत त्यानं 88.72 मीटर अंतरावर भालाफेक केली.
Arshad Nadeem Won Olympic Medal For Pakistan : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Paris 2024) भालाफेक स्पर्धेत (Javelin Competition) भारताचा धडाकेबाज भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) इतिहास रचला आहे. नीरजनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 32024 मधील भारताचं हे पहिलं रौप्यपदक आहे. सुवर्णपदक नीरजच्या हातून थोडक्यात हुकलं. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं (Arshad Nadeem) सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. तब्बल 32 वर्षांनी पाकिस्तानचा (Pakistan) ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपला आणि अर्शद नदीममुळे पाकिस्तानच्या खात्यात सुवर्णपदकाची भर पडली.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नांत 92.97 मीटरवर भाला फेकला. शेवटच्या फेरीत त्यानं 91.7 मीटर अंतरावर भालाफेक केली. पहिल्या फेरीत त्यानं फाऊल केलं असलं, तरी तिसऱ्या फेरीत त्यानं 88.72 मीटर अंतरावर भालाफेक केली. भारताच्या नीरज चोप्राकडून देशाला सोन्याच्या अपेक्षा होत्या, मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर भालाफेक केली. शेवटच्या फेरीत त्यानं 91.7 मीटर अंतरावर भालाफेक केली. पहिल्या फेरीत त्यानं फाऊल केलं असलं, तरी तिसऱ्या फेरीत त्यानं 88.72 मीटर अंतरावर भालाफेक केली. भारताच्या नीरज चोप्राकडून देशाला सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या, मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
"ज्यानं सुवर्ण जिंकलंय तो देखील आमचाच मुलगा आहे..."
अंतिम सामन्यानंतर नीरज चोप्राची आई म्हणाली, "आम्ही खूप आनंदी आहोत, आमची चांदी सोन्यासारखी आहे आणि ज्यानं (अर्शद नदीम) सुवर्ण जिंकलं आहे, तो देखील आमचा मुलगा आहे, तो खूप मेहनत करतो."
नदीमच्या भालाफेकीनं पाकिस्तानला तीन दशकांनंतर पदक मिळवून दिलं
अर्शद नदीमच्या भालाफेकीनं कापलेल्या अंतरानं केवळ नवा ऑलिम्पिक विक्रमच निर्माण केला नाही, तर पाकिस्तानला पुन्हा एकदा पदकांच्या रांगेत आणलं आहे. पाकिस्तानचा ऑलिम्पिकमधील पदकांचा इतिहास पाहिला तर पाकिस्ताननं यापूर्वी 1992 मध्ये पदक जिंकलं होतं. त्यानंतर बार्सिलोना ऑलिम्पिक 1992 मध्ये पाकिस्तानी हॉकी पुरुष संघानं कांस्यपदक जिंकलं. पाकिस्तानला एकही पदक मिळालं नव्हतं.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्ताननं पटकावलं पहिलं पदक
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला अद्याप एकही पदक मिळालं नव्हतं. या खेळांसाठी त्यांनी सात खेळाडू पाठवलं होतं. यापैकी फक्त अर्शद नदीम पाकिस्तानच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला आहे. पाकिस्ताननं ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 10 पदकं जिंकली असून त्यापैकी तीन सुवर्ण आहेत.
पाकिस्तानातही हॉकीला फटका
भारतासाठी हॉकी राष्ट्रीय खेळ आहे, पण त्यात पाकिस्ताननंही विक्रम रचले आहेत. पाकिस्ताननं तीन सुवर्णांसह आठ पदकं जिंकली आहेत. पाकिस्तानकडे हॉकीमध्येही तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकं आहेत. बॉक्सिंग आणि कुस्तीमध्ये मिळालेली दोन कांस्यपदकं ही त्याची उर्वरित दोन पदकं आहेत. पाकिस्ताननं 1956 मध्ये मेलबर्न येथे पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं, जेव्हा हॉकीमध्ये रौप्यपदक मिळालं होतं.