एक्स्प्लोर
जाहिरात जगतात धोनीच्या कमाईत 47%नी घट, तरीही अव्वल!
नवी दिल्ली: टीम इंडियाचा एकदिवसीय आणि 20-20 सामन्यांचा कर्णधार एम.एस. धोनीच्या जीवनावर अधारित बायोपिकने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेत, 132 कोटींचा आकडा सहज पार केला.
पण दुसरीकडे जाहिरात जगतात धोनीच्या कमाईवर परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या 'फॅब-40'च्या यादीत गेल्या वर्षभरात धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये कमालीची घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत 47% घट झाली असून, त्याने जाहिरातीद्वारे केलेल्या कमाईचा आकडा 140 कोटीवरुन थेट 73 कोटी रुपयांवर घसरला आहे.
विशेष म्हणजे, धोनीची ही घसरण होऊनही इतर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत त्याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, जगातील टॉप-10 खेळाडूंच्या यादीत धोनी दहाव्या स्थानी असून, भारतीय क्रीडा क्षेत्रातील टॉप-10च्या यादीत तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी फोर्ब्सच्या या यादीत धोनी पाचव्या स्थानी होता. गेल्या वर्षी त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू 140 कोटी रुपये होती. मात्र, यावर्षी त्यात घसरण झाल्याने त्याला दहाव्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.
या यादीत खेळाडूंच्या कमाईचे मुल्यमापन करताना, त्याच्या एकूण उत्पन्नातून जाहिरातीद्वारे कमावलेले उत्पन्न वेगळे कढून ही यादी दिली जाते. या आधारावरच त्या खेळाडूंची ब्रॅण्ड व्हॅल्यू निश्चित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement