(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs CSK IPL 2020 : कोलकाताचा चेन्नई सुपरकिंग्ज वर 10 धावांनी विजय; धोनीच्या टीमचा चौथा पराभव
आयपीएल 2020 मधील 21व्या मॅचमध्ये कोलकाता नाइटरायडर्स (KKR) ने चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) चा 10 धावांना पराभव केला. कोलकाता नाइटरायडर्सने प्रथम बॅटींग करत चेन्नई सुपरकिंग्जला 168 धावांचे लक्ष्य दिलं होतं. धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 20 षटकात पाच गडी गमावून 157 धावा जमवू शकला.
CSK vs KKR IPL 2020 : फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला कॅरेबियन खेळाडू आंद्रे रसेल याने बॅटिंगमध्ये गमावलं अन् गोलंदाजीत कमावलं अशी म्हणायची वेळ आली आहे. 19 व्या षटकात सुनील नारायण आणि शेवटच्या षटकात आंद्रे रसेलने टिच्चून गोलंदाजी केल्याने सुरुवातीला चांगली सुरुवात करुनही चेन्नईला विजय मिळवता आला नाही. चेन्नईचा 10 धावांनी पराभव झाला आहे.
शेन वॉटसनने आपला फॉर्म कायम ठेवत आजही अर्धशतक झळकावलं आहे. त्याने 40 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा जमवल्या. अंबाती रायडूने सुरेख खेळी करत त्यात आपल्या 30 धावा जोडल्या. मात्र, त्यानंतर कुणालाही चांगली धावा जमवता आल्या नाहीत. केदार जाधवला तर पहिले पाच चेंडूवर एकही धाव काढता आली नाही. रविद्र जडेजाने शेवटी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फार उशीर झाला होता. जडेजाने 8 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 21 धावा काढल्या.
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने फलंदाजीच्या क्रमवारीत मोठा बदल करत सुनील नाराणय ऐवजी राहुल त्रिपाठीला सलामीला पाठवलं. राहुलने संधीचं सोनं करत धडाकेबाज अर्धशतक ठोकलं आहे. एकीकडे कोलकाताचे फलंदाज अपयशी ठरत असताना राहुलने एक बाजू लावून धरत धावसंख्या हलती ठेवली. त्याने 51 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 81 धावांची खेळी केली.
IPL 2020 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहची कमाल; पर्पल कॅपच्या शर्यतीत प्रबळ दावेदार
राहुल त्रिपाठी वगळता कुणालाही लौकिकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. ट्वेंटी ट्वेंटीमध्ये फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, नितीश राणा, सुनील नारायण हे अपयशी ठरले. सुनाल नारायण नेहमी सलामीला फलंदाजीला जातो. आज त्याला मधल्या फळीत खेळवण्यात आले. मात्र, तो आजही अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत कोलकाताच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. शेवटपर्यंत झुंज देणारा राहुल त्रिपाठीही माघारी परतला. त्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावरच केकेआरने 167 धावांपर्यंत मजल मारु शकले.
चेन्नईच्या गोलंदाजांनी आज टिच्चून गोलंदाजी करत कोलकाताचा सर्व संघ गारद केला. आपल्या भेदक गोलंदाजीने त्यांनी कोलकाताच्या फलंदाजांना जोखडून ठेवण्यात यश मिळवलं. गोलंदाजीमध्ये अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने 3, करन शर्मा, शार्दुल ठाकूर आणि सॅम कुर्रान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. यात दीपक चहर वगळता कोणीही जास्त धावा दिल्या नाहीत.