40 वर्षाच्या मिश्राजीचा झेल पाहून तरुण खेळाडूही लाजतील, पाहा जबराट झेलचा व्हिडीओ
Amit Mishra Catch : 40 वर्षाच्या अमित मिश्राने आज लखनौकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलेय.
Amit Mishra Catch : 40 वर्षाच्या अमित मिश्राने आज लखनौकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. या सामन्यात अमित मिश्राने भेदक गोलंदाजी तर केलीच, पण फिल्डिंगही जबराट केली. अमित मिश्राने राहुल त्रिपाठीचा झेल हवेत झेपवत घेतला. या झेलची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरुन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
18 व्या षटकात राहुल त्रिपाठी याने जोरदार फटका मारला होता. हा चेंडू चौकार जाईल असेच वाटले, पण त्याचवेळी 40 वर्षाचा तरुणमध्ये आला. अमित मिश्रा याने हवेत झेपवत जबराट झेल घेतला. जम बसलेल्या राहुल त्रिपाठीचा डाव इथेच संपला. राहुल त्रिपाठी 34 धावांवर खेळत होता. अखेरचे दोन षटके बाकी होती, त्यामुळे त्याने फटकेबाजीला सुरुवात केली होती, पण मिश्राजीने झेल घेत हैदराबादला धक्का दिला.
पाहा व्हिडीओ -
ICYMI - A brilliant diving catch by @MishiAmit ends Rahul Tripathi's stay out there in the middle.#TATAIPL #LSGvSRH pic.twitter.com/uJkjykYlJt
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
अमित मिश्राने फिल्डिंगमध्ये तर कमाल केलीच. पण गोलंदाजीतही त्याने प्रभावी मारा केला. अमित मिश्राने 4 षटकात 23 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. आदिल रशिद आणि वॉशिंगटन सुंदर यांना अमित मिश्राने तंबूचा रस्ता दाखवला.
आयपीएलमध्ये अमित मिश्राची कामगिरी कशी ?
40 वर्षीय अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये अनेक विक्रम केले आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो आघाडीच्या पाच गोलंदाजामध्ये आहे. आयपीएलमध्ये अमित मिश्रा याने 154 सामन्यात 24 च्या सरासरीने 166 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा अकॉनमी रेट 7.36 इतका राहिलाय. याशिवाय अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये हॅट्ट्रीक घेण्याचा पराक्रमही केलाय. आता तो 40 व्या वर्षी कशी कामगिरी करतो.. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणा आहे. पियुष चावला याने मुंबईकडून गोलंदाजी करताना दमदार कामगिरी केली होती, आज अमित मिश्रा कशी गोलंदाजी करतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
कृणाल पांड्या, रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा या फिरकी त्रिकुटापुढे हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. क्रृणाल पांड्याने तीन विकेट घेतल्या. तर अमित मिश्राने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोई याने एक विकेट घेतली. या तिन्ही फंलदाजांनी धावाही रोखल्या. कृणाल पांड्याने चार षटकात अवघ्या 18 धावा खर्च केल्या. तर रवि बिश्नोई याने फक्त 16 धावा दिल्या. अमित मिश्रा याने चार षटकात 23 धावा दिल्या.
आणखी वाचा :
फिरकीपुढे हैदराबादच्या नवाबांची दाणादाण
KKR च्या सुयश शर्माचं IPL पदार्पण, नेटकरी म्हणाले, अरे हा तर भालफेकपटू नीरज चोप्रो
कृणाल पांड्याच्या फिरकीपुढे मार्करम हतबल, दांडी झाली गुल, पाहा व्हिडीओ