Zero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये
Zero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये
मंडळी आजचा दिवस गाजवला तो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी. आणि त्यानंतर राज्यातल्या बंडखोर नेत्यांनी.
महाराष्ट्रात सगळ्या पक्षांकडून उमेदवार फायनल करण्यात आले. तसंच आज बंडखोरीही निश्चित झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सगळ्याच आघाड्यांच्या प्रमुखांनी शेवटच्या दिवसापर्यंत बंडखोरांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले.. काही ठिकाणी त्यांना यश आलं.. पण, काही ठिकाणी बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले...
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली.. त्यामुळं आजही महाविकास आघाडी असो महायुती, दोन्ही आघाड्यांच्या सगळ्या प्रमुखांची चांगलीच दमछाक झाली.. कोणकोणत्या बंडखोरांनी आज अर्ज मागे घेतले.. आणि कोणी आपली उमेदवारी कायम ठेवत पक्षालाच आव्हान दिलं.. हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत..
पण, सुरुवातीला मराठा आरक्षण आंदोलकाचे पोस्टर बॉय मनोज जरांगे पाटलांची एक घोषणा...
मंडळी, मनोज जरांगे पाटलांनी काही मतदारसंघांत उमेदवार देण्याची काल संध्याकाळी घोषणा केली होती. त्यांनी काही नावं जाहीर केली. म्हणजेच मराठा समाजातल्या ज्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले होते.. ते त्यांच्याच पाठिंब्यानं उभे असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर काही मतदारसंघांत आपण पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाच्या वेगवेगळ्या भागातील प्रतिनिधींशी चर्चा करायला सुरुवात केली..
वाटलं होतं.. आज सकाळी मजोन पाटील आपल्या आणखी काही उमेदवारांची नावं जाहीर करतील.
मनोज जरांगेंनी आज घेतलेली भूमिका अंतिम असेल की नाही? हे आज सांगणं कठीण आहे... कारण, एबीपी माझाच्याच मुलाखतीत मनोज जरांगेंनी पुढील दोन-एक दिवसांमध्ये उमेदवार पाडायचे की नाही हे सांगणार असल्याची घोषणा केली..
त्यामुळं आज फक्त एक गोष्ट फायनल झाली.. ती म्हणजे या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांचे अधिकृत असे उमेदवार नसणारयत.
आता आजच्या याच निर्णयातून मनोज जरांगेंनी काय काय साध्य केलं.. याची अनेक अर्थांनं चर्चा आणि विश्लेषण होऊ शकतं. पण, समजा त्यांनी उमेदवार दिले असते तर काय झालं असतं? अशा वेळी त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी काहींचा पराभव झाला असता तर त्याचा फटका मराठा आंदोलनाला बसला असता का?...
किंवा जर काही ठिकाणी जरांगेनी उमेदवार दिले असते... तर कदाचित मनोज जरांगेंना तेवढ्याच मतदारसंघात अडकून पडावं लागलं असतं का? अशा अनेक गोष्टींवरही चर्चा सुरु आहेत..
मंडळी, या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील.. तूर्तास तरी मनोज जरांगेंनी आपल्यासाठी सगळे पर्याय खुले ठेवलेत हेही तितकंच खरंय..