कृणाल पांड्याच्या फिरकीपुढे मार्करम हतबल, दांडी झाली गुल, पाहा व्हिडीओ
Krunal Pandya in IPL : लखनौच्या कृणाल पांड्याने हैदराबादविरोधात अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली.
Krunal Pandya in IPL : लखनौच्या कृणाल पांड्याने हैदराबादविरोधात अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. कृणालच्या गोलंदाजीसमोर हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कृणाल पांड्याने हैदराबादची आघाडी फळी तंबूत पाठवली. यामध्ये अनमोलप्रीत सिंह, मयंक अग्रवाल आणि एडन मार्करम याचा समावेश आहे. कृणाल पांड्याने चार षटकात फक्त 18 धावा खर्च करत तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये एडन मार्करम याचा त्रिफाळा उडवलेला चेंडू सध्या चर्चेचा विषय आहे. कर्णधार म्हणून माक्ररम याने पदार्पण केले, पण पहिल्याच सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. हा चेंडू इतका घातक होता की मार्करमला काही समजण्याआधीच दांडी उडावली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कृणाल पांड्या याने एकाच षटकात हैदराबादला लागोपाठ दोन धक्के दिले. आधी जम बसलेल्या अनमोलप्रीत सिंह याचा अडथळा दूर केला. त्यानंतर यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या एडन मार्करमचा त्रिफाळा उडवला. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
Krunal Pandya on song here!
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
Picks up two key wickets in as many deliveries.
Anmolpreet Singh and Aiden Markram depart.
Live - https://t.co/7Mh0bHCrTi #TATAIPL #LSGvSRH #IPL2023 pic.twitter.com/33W5Uf4Gpv
Golden duck for Aiden Markram on captaincy debut.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2023
Krunal Pandya on fire! pic.twitter.com/mfv0bPn3Zk
Magnificent spell from Krunal Pandya.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 7, 2023
3/18 in 4 overs with the wickets of Markram, Agarwal and Anmolpreet. Excellent stuff from Krunal! pic.twitter.com/hdXEdnxTHa
फिरकी त्रिकूटाने हैदराबादची दाणादाण उडवली -
कृणाल पांड्या, रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा या फिरकी त्रिकुटापुढे हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. क्रृणाल पांड्याने तीन विकेट घेतल्या. तर अमित मिश्राने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोई याने एक विकेट घेतली. या तिन्ही फंलदाजांनी धावाही रोखल्या. कृणाल पांड्याने चार षटकात अवघ्या 18 धावा खर्च केल्या. तर रवि बिश्नोई याने फक्त 16 धावा दिल्या. अमित मिश्रा याने चार षटकात 23 धावा दिल्या.
फिरकीपुढे हैदराबादच्या नवाबांची दाणादाण
हैदराबादच्या फिरकीपुढे हैदराबादचे फलंदाजांची दाणादाण उडाली. निर्धारित 20 षटकात हैदराबादने 8 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा केल्या. हैदराबादच्या तीन फिरकी गोलंदाजांनी हैदराबादच्या सहा गड्यांना तंबूत पाठवले. कृणाल पांड्या, अमित मिश्रा आणि रवि बिश्नोई या फिरकी त्रिकुटासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. लखनौला विजयासाठी 122 धावांचे आव्हान आहे.
आणखी वाचा :
KKR च्या सुयश शर्माचं IPL पदार्पण, नेटकरी म्हणाले, अरे हा तर भालफेकपटू नीरज चोप्रो