IPL 2022 Orange and Purple Cap: ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी 'या' खेळाडूंमध्ये स्पर्धा...
आयपीएल 2022 हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामात ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी खेळाडूंमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळत आहे.
IPL 2022 Orange and Purple Cap : आयपीएल 2022 हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये क्वालिफायरचा एकचा सामना होणार आहे. तर के एल राहुलच्या नेतृत्वातील लखनौचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, आयपीएलच्या या हंगामत राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल पुन्हा एकदा पर्पल कॅपच्या शर्यतीत आला आहे. चहलने रॉयल चैलेंजर्स बंगळुरुचा श्रीलंकन गोलंदाज वानिंदू हसरंगाला मागे टाकले आहे. चहलने एकूण 26 विकेट घेत पहिलं स्थान पटकावलं आहे.
शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने चेन्नईविरुद्ध दोन विकेट घेतल्या. या विकेटसह त्याने या मोसमातील त्याच्या एकूण बळींची संख्या 26 वर नेली आहे. सर्वात जास्त विकेट घेण्याऱ्या गोलंदाजांच्य यादीत चहन आता पहिल्या क्रमांकावर आहे. आता पुन्हा पर्पल कॅप त्याच्याकडे आली आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा स्फोटक फलंदाज जोस बटलर याच्याकडे या हंगामातील ऑरेंज कॅपवर आहे. बटलरला के एल राहुल आणि डी कॉक यांच्याकडून स्पर्धा मिळत आहे.
बटलरने या मोसमात आतापर्यंत 14 सामन्यांत 48.38 च्या फलंदाजीच्या सरासरीने आणि 146.96 च्या स्ट्राइक रेटने 629 धावा केल्या आहेत. धावा करण्याच्या बाबतीत तो इतर फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे. बटलरपाठोपाठ लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुल आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही खेळाडूंनी 500 हून अधिक धावा केल्या आहेत.
एकूण धावसंख्येत पुढे असणारे फलंदाज
जोस बटलरने 14 सामन्यात 629 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर के एल राहुल आहे. राहुलने 14 सामन्यात 537 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या क्विंटन डी कॉकने 14 सामन्यात 502 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर फाफ डु प्लेसिस आहे. त्याने 14 सामन्यात 443 धावा कल्या आहेत .तर पाचव्या क्रमांकावर डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरने 11 सामन्यात 427 धावा केल्या आहेत.
'या' गोलंदाजांमध्ये पर्पल कॅपसाठी स्पर्धा
पर्पल कॅप जिंकण्याची काही खेळाडूंमध्ये जोरदार स्पर्धा सरु आहे. 20 हून अधिक बळी घेऊन या शर्यतीत पाच गोलंदाज सामील आहेत. चहल आणि वनंदू आघाडीवर आहेत. चहलच्या नावावर 26 तर वानिंदूच्या नावावर 24 विकेट्स आहेत. रबाडा, उमरान मलिक आणि कुलदीप यादवही हे फलंदाजही स्पर्धेत आहेत.
कोणाच्या नावावर किती विकेट
युजवेंद्र चहल आत्तापर्यंत 14 सामन्यात 26 विकेट गेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर वानिंदू हरसंगा आहे. हरसंगाने 14 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. कगिसो रबाडाने 12 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. तर उमरान मलिकने 13 सामन्यात 21 आणि कुलदीप यादवने 13 सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत.