Andre Russell: शून्यावर बाद झाल्यानंतर आंद्रे रसल नेमका गेला होता तरी कुठे? व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी का भडकले?
IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC Vs KKR) यांच्यात आयपीएल 2022 मधील 41 वा सामना खेळण्यात आला.
![Andre Russell: शून्यावर बाद झाल्यानंतर आंद्रे रसल नेमका गेला होता तरी कुठे? व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी का भडकले? DC Vs KKR, IPL 2022: Kolkata Knights Riders Batsmen Andre Russell Trolled against Delhi Capitals Match Andre Russell: शून्यावर बाद झाल्यानंतर आंद्रे रसल नेमका गेला होता तरी कुठे? व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी का भडकले?](https://wcstatic.abplive.in/en/prod/wp-content/uploads/2019/05/5-f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC Vs KKR) यांच्यात आयपीएल 2022 मधील 41 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात दिल्लीच्या संघानं कोलकात्यावर 4 विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. दरम्यान, कोलकाताच्या विस्फोटक फलंदाज आंद्रे रसलला त्यानं शून्यावर बाद करून माघारी धाडलं. शून्यावर बाद झाल्यानंतर आंद्रे रसल कुठे गेला? ज्यामुळं त्याला ट्रोल केलं जातंय. याबाबत जाणून घेऊयात.
कोलकात्याविरुद्ध सामन्यात कुलदीप यादवनं आठव्या षटकात प्रथम बाबा इंद्रजीत बाबा (6 धावा) आणि सुनील नारायण (0 धाव) माघारी धाडलं. त्यानंतर 14 व्या षटकात श्रेयस अय्यर आणि विस्फोटक फलंदाज आंद्रे रसल बाद केलं. श्रेयस अय्यरनं 42 धावा केल्या. तर, आंद्रे रसल खातं न उघडताच माघारी परतला. शून्यावर बाद झाल्यानंतर जेव्हा आंद्रे रसल पव्हेलियनमध्ये गेला. त्यावेळी त्यानं आपल्या हातात डिनर प्लेट घेतली. टीव्ही कॅमेऱ्यात तो डीनर करताना दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर आंद्रे रसल ट्रोल करण्यात आलं.
कोलकात्याचा चार विकेट्सनं पराभव
दिल्लीविरुद्ध नाणेफेक गमवल्यानंतर कोलकात्याचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. दरम्यान, कोलकात्याच्या संघानं 20 षटकात 9 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. कोलकात्यानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघानं 4 विकेट्स राखून विजय मिळवला. दिल्लीच्या सलामीवीर डेव्हिड वार्नरनं 26 चेंडूत तडाखेबाजी खेळी करत 42 धावा केल्या.
कोलकात्याचा सलग पाचवा पराभव
यंदाच्या हंगामात कोलकात्याच्या संघानं 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामने गमावले आहेत. तर, तीन सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, कोलकात्याच्या संघाला सलग पाच सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)