Kuldeep Yadav: कुलदीप यादव थांबायचं नावचं घेईना! आता सचिन तेंडुलकरच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणारा कुलदीप यादव (Kuldeep Yadav) सध्या खूपच चर्चेत आला आहे.
![Kuldeep Yadav: कुलदीप यादव थांबायचं नावचं घेईना! आता सचिन तेंडुलकरच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी IPL 2022: Kuldeep Yadav joins Virat Kohli, Sachin Tendulkar in special list with game-changing four-fer in DC vs KKR tie Kuldeep Yadav: कुलदीप यादव थांबायचं नावचं घेईना! आता सचिन तेंडुलकरच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/29/8381e917cdeb6f143fefe6f838557c33_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणारा कुलदीप यादव (Kuldeep Yadav) सध्या खूपच चर्चेत आला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर काल दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट राडयर्डचा संघ (Delhi Capitals Vs Kolkata Knights Riders) आमने सामने आला. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीनं चार विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यात कुलदीप यादवनं 14 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. हे कुलदीप यादवच्या आयपीएल कारकिर्दितील सर्वोकृष्ट प्रदर्शन आहे.
कोलकात्याच्या 'या' खेळाडूंना कुलदीपनं जाळ्यात अडकवलं
कोलकात्याविरुद्ध सामन्यात कुलदीप यादवनं आठव्या षटकात प्रथम बाबा इंद्रजीत बाबा (6 धावा) आणि सुनील नारायण (0 धाव) माघारी धाडलं. त्यानंतर 14 व्या षटकात श्रेयस अय्यर आणि विस्फोटक फलंदाज आंद्रे रसल बाद केलं. श्रेयस अय्यरनं 42 धावा केल्या. तर, आंद्रे रसल खातं न उघडताच माघारी परतला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीरांचा पुरस्कार जिंकणारे खेळाडू-
विराट कोहली | 5 |
सचिन तेंडुलकर | 4 |
रोहित शर्मा | 4 |
ऋतुराज गायकवाड | 4 |
कुलदीप यादव | 4 |
कुलदीप यादवची सचिन तेंडुलकरांच्या विक्रमाशी बरोबरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कुलदीप यादवला चौथ्यांदा सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. या कामगिरीसह त्यानं एका हंगामात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश केला आहे. दरम्यान, सचिन तेंडूलकर, ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा यांनी एकाच हंगामात चार वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. या यादीत आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्यानं पाच वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)