IPL 2022: महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर एबी डिव्हिलियर्सची मोठी प्रतिक्रिया
IPL 2022: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नईच्या (CSK) संघाचं कर्णधारपद सोडलं.
IPL 2022: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नईच्या (CSK) संघाचं कर्णधारपद सोडलं. महेंद्रसिंह धोनीनं घेतलेला हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक होता. दरम्यान, क्रिडाविश्वात महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्याची चर्चा रंगली असताना बंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं धोनीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय. धोनीच्या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे, असंही डिव्हिलियर्सनं म्हटलंय.
डीव्हिलियर्सन म्हणाला की, "धोनीनं घेतलेल्या निर्णयानं मला आश्चर्य वाटले नाही. त्याच्या निर्णयाचं मी समर्थन करतो. कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणं काहींना सोप वाटतं असेल. परंतु, ही जबाबादारी तुम्हाला पूर्णपणे थकवते. जेव्हा तुमचा संघ निराशाजनक कमगिरी करतो, तेव्हा तुमची झोप उडते. मला असं वाटतं की, चेन्नईच्या संघानं गेल्या हंगामात आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर धोनीनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. धोनीनं घेतलेला हा निर्णय योग्य आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय. दरम्यान, आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यास चेन्नईचा संघ पहिल्यांदा 2020 मध्ये अपयशी ठरला होता. मात्र, त्यानंतर जबरदस्त कमबॅक करत चेन्नईच्या संघानं चौथ्यांदा आयपीएलचा खिताब जिंकला.आयपीएलमध्ये धोनीला खेळताना पाहण्यासाठी मी खूप उत्साहित असल्याचे डिव्हिलियर्सनं सांगितलं. तसेच धोनीला उत्तुंग षटकार मारताना मला पाहायचं आहे, असंही डिव्हिलियर्सनं म्हटलंय. धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
हे देखील वाचा-
- IPL 2022: चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी
- PAK VS AUS: बाप को भेज, तेरे बस की बात नही! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानचे चाहते भडकले
- IPL 2022: श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी! एकानं वनडेत चोपलं, दुसऱ्यानं कसोटीत धुतलं, आज दोघंही आमने-सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha