IPL 2022: श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी! एकानं वनडेत चोपलं, दुसऱ्यानं कसोटीत धुतलं, आज दोघंही आमने-सामने
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super kings) नव्या नेतृत्वासह मैदानात उतरणार आहेत.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून (26 मार्च) सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super kings) नव्या नेतृत्वासह मैदानात उतरणार आहेत. कोलकाता नेतृत्व भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असेल. तर, चेन्नईचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) असेल. महत्वाचे म्हणजे, हे दोघेही युवा कर्णधार म्हणून आज आमने सामने येणार आहेत. नुकताच भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांची या दोघांनी शाळा घेतली होती. श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरनं तुफान फलंदाजी केली होती. तर, श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजानं 175 धावांची वादळी खेळी केली होती. यामुळं आजच्या सामन्यात दोघंही कर्णधार म्हणून कशी कामगिरी बजावतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरची तुफानी खेळी
श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यर सलग तीन अर्धशतक ठोकले. या तिन्ही सामन्यात तो नाबाद राहिला होता. त्यानं पहिल्या सामन्यात नाबाद 57 दुसऱ्या सामन्यात नाबाद 74, त्यानंतर अखेरच्या आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद 73 धावांची खेळी केली होती.या कामगिरीमुळं श्रेयस अय्यरला सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. श्रेयसनं श्रीलंकेविरुद्ध सलग तिसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतक झळकावून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सलग तीन टी20 सामन्यात अर्धशतकं झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजाची चमकदार कामगिरी
श्रीलंकाविरुद्ध मोहाली येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजानं चमकदार कामगिरी केली होती. त्यानं या सामन्यात 175 धावांची दमदार खेळी केली होती. या कामगिरीसह रवींद्र जाडेजानं भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच विक्रम मोडीत काढला होता. कपिल देव यांनी फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर येऊन 170 धावांची खेळी होती. आता विक्रम जाडेजाच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. त्यानं फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर येऊन 175 धावांची खेळी आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : आजपासून आयपीएल 2022 ची सुरुवात, 10 संघांत लढत, पहिल्या सामन्यात कोलकाता आणि चेन्नई आमनेसामने
- IPL 2022, CSK vs KKR : सर रवींद्र जाडेजापुढे श्रेयस अय्यरचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
- IPL 2022 : जोश तोच... अंदाज नवा! आयपीएलच्या 15 व्या मोसमात नवं काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha