Coronavirus Effect | कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता
आयपीएलची तारीख पुढे ढकलण्यासंदर्भातही बीसीसीआयकडून विचार केला जाऊ शकतो. मात्र तसं करणं कठीण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर लक्षात घेत आयपीएलच्या तारखांची घोषणा केली जाते.
मुंबई : जगभरातील क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमियर लीगची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाचं आयपीएलचं 13 वं सीजन 29 मार्चपासून सुरु होत आहे. मात्र आयपीएल स्पर्धा कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएल स्पर्धा रद्द केली जाऊ शकते. कोरोनामुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. या लिस्टमध्ये आयपीएलचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
येत्या 29 मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलची सुरुवात होईल, त्यावेळी देशातील तापमानाचा पारा अंदाजे 24-25 सेल्सिअस अंश असण्याची शक्यता आहे. परिणामी कोरोनाचा कहरही कमी होऊ शकतो. त्यामुळे आयपीएल स्पर्धा रद्द करावी की नाही, या संभ्रमात बीसीसीआय आहे.
आयपीएलची तारीख पुढे ढकलण्यासंदर्भातही बीसीसीआयकडून विचार केला जाऊ शकतो. मात्र तसं करणं कठीण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर लक्षात घेत आयपीएलच्या तारखांची घोषणा केली जाते. त्यामुळे आयपीएलची तारीख मागे-पुढे होणे तुर्तास तरी शक्य वाटत नाही. मात्र कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिघडली तर आयपीएल स्पर्धा रद्द केली जाणार हे निश्चित आहे. कोरोना व्हायरस गर्दीमुळे जास्त पसरतो. या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केली आहे.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी त्याचं क्रिकेटमधील भविष्य ठरवेल : अनिल कुंबळे
कोरोना व्हायरस जगभरात वेगाने परसरत आहेत. जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरसची रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोना बाधितांचा आकडा 42 वर आहे. कालपर्यंत देशात 39 कोरोनाबाधित होते. त्यात दिल्ली, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित असल्याची नोंद झाली आहे.
कोरोनामुळे 3600 जणांचा मृत्यू
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख 10 हजारांवर पोहोचली आहे, तर 3 हजार 600 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सर्वाधिक 3119 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इटलीमध्यी 366 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. गेल्या 24 तासात बळींच्या आकड्यात 133 ने वाढला आहे. इतर देशांतील मृतांचा आकडा इराण - 194 मृत्यू दक्षिण कोरिया - 50 मृत्यू अमेरिका - 21 मृत्यू फ्रान्स - 19 मृत्यू स्पेन - 10 जपान - 6 मृत्यूCoronaVirus Effect | आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार : आरोग्यमंत्री
संबंधित बातम्या