एक्स्प्लोर

Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ

Pandharpur Viral Video : पंढरपूर शहरात ट्रक चालकाला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर पोलीस आणि ट्रक चालकाने एकमेकांवर आरोप केले आहेत.

सोलापूर : पंढरपूर शहरात एका ट्रक चालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सांगोला मार्गावरील चौकात हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत असून, या घटनेमुळे वाहतूक शाखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये अवजड वाहन चालकाला पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळत नो एन्ट्रीचे उल्लंघन केल्याने नियमानुसार कारवाई केल्याचा दावा केला आहे.

No Entry Fine Dispute : दंडावरून वाद, लाचेचा आरोप

सदर ट्रक चालकाने नो एन्ट्रीमध्ये वाहन आणल्यामुळे पोलिसांनी दोन हजार रुपये घेतले, मात्र त्याची पावती दिली नाही, असा गंभीर आरोप केला आहे. पुढे काही अंतर गेल्यानंतर चालकाच्या मोबाईलवर एक हजार रुपयांच्या दंडाचा मेसेज आल्याचं त्याने सांगितलं.

याबाबत विचारणा करण्यासाठी चालक परत चौकात आला असता पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

MLA Intervention : आमदार राजाभाऊ खरे यांचा हस्तक्षेप

ही घटना घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे त्या मार्गाने जात होते. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांनीही वाहतूक शाखेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Police Statement : पोलीस निरीक्षकांचा खुलासा

पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी मात्र चालकाने नो एन्ट्रीचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि पावतीही देण्यात आल्याचा दावा केला आहे. मारहाणीच्या आरोपांबाबत त्यांनी भाष्य करण्याचे टाळले आहे. 

दरम्यान, हा मुद्दा सुरू असलेल्या अधिवेशनात मांडणार असल्याचा दावा आमदार राजाभाऊ खरे यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेमुळे पंढरपूरमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून नव्याने वाद निर्माण झाला असून पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
Solapur Crime:
"घरातून हाकलून देईन..."; सुनेच्या धमकीनं सासऱ्यानं जीवन संपवलं! सोलापूरात खळबळ
Solapur Weather : सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर; उष्माघातपासून वाचण्यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन
सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर; उष्माघातपासून वाचण्यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन
Solapur News : सोलापूरकरांसाठी दोन महत्त्वाच्या अपडेट्स, गॅस तुटवड्यामुळे हॉटेल इंडस्ट्री ठप्प होण्याच्या दिशेने, वाहतूक विभागाचा मोठा निर्णय
सोलापूरकरांसाठी दोन महत्त्वाच्या अपडेट्स, गॅस तुटवड्यामुळे हॉटेल इंडस्ट्री ठप्प होण्याच्या दिशेने, वाहतूक विभागाचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget