(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 : तब्बल 7.75 कोटींची बोली लागल्यामुळे शिमरॉन हेटमायरचा जोरदार डान्स
पुढील वर्षी मार्चमध्ये आयपीलचे 13 वे पर्व सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल कोलकात्यामध्ये भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचा लिलाव पार पडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
कोलकाता : पुढील वर्षी मार्चमध्ये आयपीलचे 13 वे पर्व सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल कोलकात्यामध्ये भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचा लिलाव पार पडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं कमिन्सवर तब्बल 15.50 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी 10 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर बँगलोरने 10 कोटी रुपयांची बोली लावली. वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल आणि शिमरॉन हेटमायरला अनुक्रमे 8.50 कोटी आणि 7.75 कोटी रुपयांची बोली लागली. कॉटरेलला पंजाबनं, तर हेटमायरला दिल्लीनं विकत घेतलं. हेटमायरची बेस प्राईज (मूळ किंमत ) ही अवघी 50 लाख रुपये इतकी होती. परंतु त्याला त्याच्या बेस प्राईजच्या तब्बल साडेपंधरा पटीने अधिक किंमत मिळाली आहे. हेटमायरने त्याच्यावर लागलेल्या तब्बल 7.75 रुपयांच्या बोलीचा आनंद नृत्य करुन साजरा केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता आणि राजस्थानसोबतच्या शर्यतीत हेटमायरला पावणे आठ कोटींचा चढा भाव दिला. गेल्या मोसमात हेटमायर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळला. पण पाच सामन्यांमध्ये मिळून त्याला केवळ 90 धावाच करता आल्या होत्या. यंदाच्या भारत दौऱ्यात मात्र हेटमायरला छान सूर गवसला आहे. त्यामुळेच त्याच्यावर बोली लावण्यासाठी तीन फ्रँचाईजींमध्ये चुरस पाहायला मिळाली.
हेटमायरचा डान्स पाहा
Us: Hi, Mr. Shimron. Welcome to DC! Can you please share a message for our fans?
*1 minute later*@SHetmyer:#IPLAuction2020 #IPLAuction #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/NrcjO03sJO — Delhi Capitals (@DelhiCapitals) December 19, 2019
संबंधित बातम्या :
IPL 2020 : मैदान गाजवणारे 'हे' 15 दिग्गज Unsold
IPL 2020 : किंग्स 11 पंजाबने कर्णधार बदलला, 'या' भारतीय खेळाडूच्या हाती संघाची धुरा
IPL auction : आयपीएल लिलावात पॅट कमिन्स सर्वात महागडा खेळाडू तर मुंबईचा यशस्वी जैस्वाल करोडपती