Hockey World Cup 2023: हॉकीच्या महाकुंभाचं उद्घाटन; 16 संघ, 44 सामने, 13 जानेवारीपासून हॉकी विश्वचषकाचा उत्साह
Hockey World Cup 2023: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. बुधवारी संध्याकाळी कटक येथील बाराबती स्टेडिअममध्ये विश्वचषकाच्या उद्घाटनचा रंगारंग कार्यक्रम झाला.
Hockey World Cup 2023: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. बुधवारी संध्याकाळी कटक येथील बाराबती स्टेडिअममध्ये विश्वचषकाच्या उद्घाटनचा रंगारंग कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे हजारो लोक साक्षीदार होते. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, एफआयएच अध्यक्ष तैयब इकराम आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांच्यासह 16 संघ या कार्यक्रमाला हजर होते. रणवीर सिंह याच्यासह अनेक स्टार कलाकरांमुळे या कार्यक्रमाला चार चाँद लागले आहेत.
13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी होणार आहे. भारतासह 16 संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. 16 संघाला चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून 44 सामने होणार आहेत. हॉकी विश्वचषकात भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत सिंह याच्याकडे आहे. हॉकी विश्वचषक सलग दुसऱ्यांदा भारतामध्ये होत आहे.
𝗔𝗡 𝗘𝗟𝗘𝗖𝗧𝗥𝗜𝗙𝗬𝗜𝗡𝗚 𝗣𝗘𝗥𝗙𝗢𝗥𝗠𝗔𝗡𝗖𝗘 ⚡@RanveerOfficial made a grand entrance at the #BarabatiStadium and swayed the audience with his charismatic performance.#HockeyComesHome #HockeyHaiDilMera #OdishaForHockey #HWC2023 #HockeyWorldCup pic.twitter.com/IwQS739Oe7
— Odisha Sports (@sports_odisha) January 11, 2023
The majestic Disha Patani enthralled the crowd present at the Barabati Stadium with her mesmerizing performance during celebrations of #HWC2023.#HWC2023 #HockeyComesHome #HockeyHaiDilMera pic.twitter.com/ipyWUXlrsj
— Odisha Sports (@sports_odisha) January 11, 2023
Hockey World Cup 2023 Schedule: कसं आहे विश्वचषकाचं वेळापत्रक
13 जानेवारी
अर्जेंटिना विरुद्ध दक्षिण अफ्रिका (भुवनेश्वर) – दुपारी 1:00 वाजता
ऑस्ट्रेलिया बनाम फ्रान्स (भुवनेश्वर)- दुपारी 3:00 वाजता
इंग्लंड विरुद्ध वेल्स (राउरकेला) – सायंकाळी 5:00 वाजता
भारत विरुद्ध स्पेन (राउरकेला) – सायंकाळी 7:00 वाजता
14 जानेवारी
न्यूझीलंड विरुद्ध चिली (राउरकेला) – दुपारी 1:00 वाजता
नेदरलँड विरुद्ध मलेशिया (राउरकेला) – दुपारी 3:00 वाजता
बेल्जियम विरुद्ध कोरिया (भुवनेश्वर) – सायंकाळी 5:00 वाजता
जर्मनी विरुद्ध जापान (भुवनेश्वर) – सायंकाळी 7:00 वाजता
15 जानेवारी
स्पेन विरुद्ध वेल्स (राउरकेला) – सायंकाळी 5:00 वाजता
इंग्लंड विरुद्ध भारत (राउरकेला) – सायंकाळी 7:00 वाजता
16 जानेवारी
मलेशिया विरुद्ध चिली (राउरकेला) – दुपारी 1:00 वाजता
न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड (राउरकेला) – दुपारी 3:00 वाजता
फ्रान्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका (भुवनेश्वर) – सायंकाळी 5:00 वाजता
अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया (भुवनेश्वर) – सायंकाळी 7:00 वाजता
17 जानेवारी
कोरिया विरुद्ध जापान (भुवनेश्वर) – सायंकाळी 5:00 वाजता
जर्मनी विरुद्ध बेल्जियम (भुवनेश्वर) – सायंकाळी 7:00 वाजता
19 जानेवारी
मलेशिया विरुद्ध न्यूझीलंड (भुवनेश्वर) – दुपारी 1:00 वाजता
नेदरलँड विरुद्ध चिली (भुवनेश्वर) – दुपारी 3:00 वाजता
स्पेन विरुद्ध इंग्लंड (भुवनेश्वर) – सायंकाळी 5:00 वाजता
भारत विरुद्ध वेल्स (भुवनेश्वर) – सायंकाळी 7:00 वाजता
20 जानेवारी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (राउरकेला) – दुपारी1:00 वाजता
फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (राउरकेला) – दुपारी 3:00 वाजता
बेल्जियम विरुद्ध जापान (राउरकेला) – सायंकाळी 5:00 वाजता
कोरिया विरुद्ध जर्मनी (राउरकेला) – सायंकाळी 7:00 वाजता
24 जानेवारी
पहिला क्वार्टरफायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 4:30 वाजता
दुसरा क्वार्टरफायनल: भुवनेश्वर –सायंकाळी 7 वाजता
25 जानेवारी
तिसरा क्वार्टर-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 4:30 वाजता
चौथा क्वार्टर-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 7 वाजता
26 जानेवारी
प्लेसमेंट सामने (9 व्या ते 16 व्या क्रमांकासाठी)
27 जानेवारी
पहिला सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 4:30 वाजता
दूसरा सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी 7 वाजता
29 जानेवारी
ब्रॉन्ज मेडल सामना– सायंकाळी 4:30 वाजता
स्वर्णपदक सामना – सायंकाळी 7 वाजता