एक्स्प्लोर

Pathum Nissanka Double Century: श्रीलंकेच्या 'निसांका'चं झंजावती वादळ, झळकावलं द्विशतक, दिग्गजांशी बरोबरी, तर हिटमॅन रोहित शर्माला टाकलं मागे

Pathum Nissanka Double Century: 25 वर्षांचा पथुम निसांका हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील दहावा फलंदाज आहे.

Pathum Nissanka Smashes Double Century: मुंबई : श्रीलंकेचा (Sri Lanka National Cricket Team) क्रिकेटर पथुम निसांकानं (Pathum Nissanka) इतिहास रचला आहे. निसांकानं शनिवारी (9 फेब्रुवारी) पल्लेकेले येथे खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद 210 धावा केल्या. निसांकानं 139 चेंडूंच्या खेळीत 20 चौकार आणि आठ षटकार मारले आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा निसांका हा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च डाव खेळण्याचा विक्रम सनथ जयसूर्याच्या (Sanath Jayasuriya) नावावर होता. जयसूर्यानं 2000 मध्ये शारजाच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्ध 189 धावांची इनिंग खेळली होती. म्हणजेच, निसांकानं जयसूर्याचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे.

25 वर्षांचा पथुम निसांका हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील दहावा फलंदाज आहे. भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), रोहित शर्मा (Rohit Sharma), ईशान किशन (Ishan Kishan) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी ही कामगिरी केली आहे. विदेशी फलंदाजांमध्ये निसांका व्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल (Australia), फखर जमान (Pakistan), मार्टिन गुप्टिल (New Zealand) आणि ख्रिस गेल (West Indies) यांनी हे स्थान मिळवले आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली दुहेरी शतकं : 

200 * सचिन तेंडुलकर, 2010 
219 वीरेंद्र सेहवाग, 2011 
209 रोहित शर्मा, 2013 
264 रोहित,शर्मा, 2014 
215 ख्रिस गेल, 2015 
237* मार्टिन गुप्टिल, 2015 
208 * रोहित शर्मा, 2017 
210* फखर जमां, 2018 
210 ईशान किशन, 2022 
208 शुभमन गिल, 2023 
201* ग्लेन मॅक्सवेल, 2023 
210* पथुम निसंका, 2024

रोहित-सेहवागलाही टाकलं मागे 

पथुम निसांकानं केवळ 136 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याच्या बाबतीत निसांका तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल सारखे दिग्गज देखील या बाबतीत निसांकाच्या मागे आहेत. सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा विक्रम ईशान किशनच्या नावावर आहे, ज्यानं 2022 साली बांगलादेशविरुद्ध 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं होतं. ग्लेन मॅक्सवेल या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यानं अफगाणिस्तानविरुद्ध 128 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sachin Dhas Profile : बीडचा बाजीगर, बापाने उसनवारीने शिकवलं, पोराने नाव काढलं, टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवणारा सचिन धस कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगल्यातील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Embed widget