एक्स्प्लोर

World Cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडला जबरी धक्का, गेम चेंजर खेळाडू सलामीच्या सामन्यातून बाहेर

ODI World Cup, ENG vs NZ : विश्वचषकाच्या महाकुंभाला काही तासांत सुरुवात होणार आहे.  

ODI World Cup, ENG vs NZ : विश्वचषकाच्या महाकुंभाला काही तासांत सुरुवात होणार आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर गतविजेता इंग्लंड आणि उप विजेता न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्याच्या काही तास आधीच इंग्लंडला जबरी धक्का बसला आहे. इंग्लंडचा मॅचविनर ऑलराऊंडर बेन स्टोक्स पहिल्या सामन्याला मुकणार आहे. दुखापतीमुळे बेन स्टोक्स पहिल्या सामन्याला उपलबद्ध नसेल. 2019 च्या विश्वचषकात बेन स्टोक्स याने दमदार कामगिरी केली होती, त्यामुळे हा इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जातोय. 

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने बेन स्टोक्स अनफिट असल्याचे सांगितले. सामन्याआधी होणाऱ्या फिटनेस चाचणीनंतर बेन स्टोक्सबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. बांगलादेशविरोधातील सराव सामन्यावेळी बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाला होता. इंग्लंडच्या आघाडीच्या खेळाडूपैकी स्टोक्स एक आहे. विश्वचषकासाठी स्टोक्सने वनडेतील निवृत्ती मागे घेतली होती. 

न्यूझीलंडलाही धक्का 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पहिल्या सामन्याला उपलब्ध नसेल. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही या सामन्यात खेळणार नाही. दुखापतीमुळे दोन्ही संघाचे आघाडीचे खेळाडू पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. याचा फटका दोन्ही संघाला बसू शकतो. 2019 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर चौकार जास्त असणाऱ्या इंगलंडला विजयी घोषीत केले होते. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी किवी मैदानात उतरतील. 

 सराव सामन्यात इंग्लंडचा विजय -

गतविजेत्या इंग्लंडला दोन सराव सामने खेळायचे होते, पण भारताविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सराव सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. बांगलादेशविरोधात इंग्लंडने दमदार कामगिरी केली. हा सामनाही पावसाने प्रभावित झाला, पण डकवर्थ लुईस नियमानंतर इंग्लंडने 77 चेंडू राखून सामना जिंकला. बांगलादेशने प्रथम फंलदाजी करताना 37 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 188 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल इंग्लंडने 77 चेंडू शिल्लक ठेवून हे लक्ष्य पार केले.

दोन्ही संघाचे शिलेदार - 

न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चैपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग 

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सैम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मालन, आदिल राशिद, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किमतींत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
Embed widget