India Squad for Champions Trophy : जैस्वाल-पटेल IN, गिल-जडेजा OUT; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असं असणार टीम इंडियाचे कॉम्बिनेशन; जाणून घ्या प्लेइंग-11
Team India Playing XI Champions Trophy 2025 : इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ 20 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे.
Team India ODI Squad for Champions Trophy : इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर (Ind vs Eng ODI) भारतीय संघ 20 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा 18 किंवा 19 जानेवारी रोजी होऊ शकते, कारण याच दोन दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळची (BCCI) बैठक होणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद शमीने पुनरागमन केले, तर अक्षर पटेलला उपकर्णधार बनवण्यात आले. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ कसा असू शकतो ते आता आपण सांगूया. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणारा संघ कदाचित चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणारा संघ असेल. अशा परिस्थितीत, इंग्लंडची मालिका एक कठीण परीक्षा ठरेल.
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर हे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये असतील हे निश्चित आहे. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कप आणि श्रीलंकेतील एकदिवसीय सामन्यांमध्ये केएल राहुल मुख्य यष्टीरक्षक होता, त्यामुळे यावेळी राहुल संघात दुहेरी जबाबदारी सांभाळेल अशी शक्यता आहे. टॉप ऑर्डरमध्ये डावखुऱ्या फलंदाजांचा अभाव असल्याने यशस्वी जैस्वालला बॅकअप ओपनर म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे.
पंत आणि सॅमसन यांच्यापैकी दुसरा विकेटकीपर कोण?
दुसऱ्या विकेटकीपरच्या स्थानासाठी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन केएल राहुलशी स्पर्धा करताना दिसत आहेत. पण, या दोन्ही खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत 50 षटकांचे क्रिकेट खेळलेले नाही. श्रीलंकेत राहुलची जागा पंतने घेतली होती, पण तो फक्त सहा धावांवर बाद झाला. दरम्यान, सॅमसनने 2023 मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.
पांड्या, अक्षर असतील मुख्य अष्टपैलू खेळाडू
संघात संतुलन राखण्यासाठी हार्दिक पांड्याची निवड निश्चित आहे. युएईमधील परिस्थिती तुलनेने मंद असल्याने भारताला अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि रियान पराग या फिरकी गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागेल. त्याच वेळी पांढऱ्या चेंडूच्या फॉर्ममध्ये असल्याने जडेजाला मागे टाकून अक्षर फिरकी विभागाची जबाबदारी घेऊ शकतो. त्याला कुलदीप यादव साथ देईल. पण तो डिसेंबरमध्ये शस्त्रक्रियेनंतर परतत आहे.
वेगवान गोलंदाज कोण कोण असणार?
ऑस्ट्रेलियामध्ये जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या समस्येमुळे टीम इंडियाच्या व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. पण, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद शमीची निवड जवळजवळ निश्चित आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर शमी पहिल्यांदाच टी-20 मालिकेत पुनरागमन करेल. विजय हजारे ट्रॉफी (VHT) मध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर मोहम्मद सिराजला 15 संघात स्थान मिळू शकते, तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग संघात सामील होऊ शकतो. त्याच वेळी, वेगवान गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, मुकेश कुमार आणि हर्षित राणा यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचे संभाव्य प्लेइंग-11 खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार),यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड मालिकेसाठी भारताचा संभाव्य एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर/रियान पराग/रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/ वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह/प्रसिद्धी कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक).