एक्स्प्लोर
कांगारुंची 'दादागिरी'
क्रिकेटमध्ये आस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचे कायम वर्चस्व पाहायला मिळालंय. आता महिला संघानेही असंच वर्चस्व निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे.

क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात बलाढ्य समजले जाणारे आणि दरारा गाजवणारे दोनच संघ.... पहिला वेस्ट इंडिज आणि दुसरा ऑस्ट्रेलिया. 1975 ते 1983 या काळात विंडीजचा दरारा सर्वश्रुत होता. वन डेचे पहिले दोन्ही विश्वचषक जिंकून 83 च्या विश्वचषकातही क्लाईव्ह लॉईडच्या या संघानं अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर 1987 साली ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि तेव्हापासून सुरु झालं कांगारुपर्व. अॅलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टींग, मायकल क्लार्कसारख्या दिग्गजांनी आपल्या नेतृत्वात कांगारुंची ताकद वाढवली. 1987 नंतर ऑस्ट्रेलियानं 1999, 2003, 2007 आणि 2015 असं एकूण पाच वेळा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्यामुळे विश्वचषक ही कांगारुंची मक्तेदारी असं समीकरणच तयार झालं. ही झाली ऑस्ट्रेलियन पुरुषांची विश्वचषकातली मक्तेदारी. पण मित्रहो... ऑस्ट्रेलियन महिला संघही याबाबतीत तितकाच ताकदीचा ठरलाय. यंदाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं यजमानपद भूषवणाऱ्या ऑस्ट्रेलियानं मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली सलग सहाव्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. डोमेस्टिक क्रिकेटचा 'सचिन' वसिम जाफरची निवृत्तीची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी आजवर सहावेळा वन डे विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. तर गेल्या पाच ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात चार वेळा कांगारुंनी विजेतेपद पटकावलं आहे. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियन महिलांनी वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. यंदाच्या विश्वचषकातही लेडी कांगारुंच्या फौजेनं विश्वचषक स्पर्धेच्या व्यासपीठावर तेच सातत्य कायम ठेवलं आहे. त्यामुळे मेग लॅनिंगचा हा संघ पाचव्यांदा ट्वेन्टी ट्वेन्टीच्या विश्वचषकावर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन संघाची सर्वात जमेची बाजू म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे असलेला अनुभव. यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हेली, कर्णधार मेग लॅनिंग आणि रिचेल हाईन्सनं याआधी विश्वचषकाच्या पाच अंतिम फेरीत कांगारुंचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याशिवाय बेथ मूनी, अश्ले गार्डनर, जेन जोनासन, मेगन शूट या खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय तसच व्यावसायिक ट्वेन्टी ट्वेन्टी लीगमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे हा सर्व अनुभव पणाला लावून मेग लॅनिंगची फौज विजेतेपदासाठी भारतीय संघासमोर उभी ठाकणार आहे. 'फक्त उभं रहायचं असेल तर सिक्युरिटी गार्डला बोलवा'; संदीप पाटील यांनी अजिंक्य रहाणेवर टीका ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये आजवर चार सामने खेऴवण्यात आले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारतानं तर दोन सामने ऑस्ट्रेलियानं जिंकले आहेत. पण उभय संघातल्या आजवरच्या 19 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत 13 सामन्यांत ऑस्ट्रेलियानं बाजी मारली आहे. तर केवळ सहा सामन्यांत भारतीय महिलांना यश मिळालं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतापुढे कांगारुंची मक्तेदारी मोडीत काढण्याचं तगडं आव्हान असणार आहे. Dombivali Cricket Match | डोंबिवलीत गुजराती, मारवाडींसाठी 'नमो रमो क्रिकेट ट्रॉफी' मराठी भाषिकांना नो एन्ट्री
आणखी वाचा























