(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'फक्त उभं रहायचं असेल तर सिक्युरिटी गार्डला बोलवा'; संदीप पाटील यांनी अजिंक्य रहाणेवर टीका
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या ख्राईस्टचर्च कसोटीत भारताचा सात विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारताला 2-0 असा क्लीनस्वीप दिला. ख्राईस्टचर्चच्या हेग्ले ओवर मैदानात खेळवण्यात आलेला हा सामना अवघ्या तिसऱ्या दिवशीच संपला होता.
मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिकेट 2-0 ने पराभवाला सामोरं जावं लागलं. यादरम्यान भारतीय संघाच्या फलंदाजांना फारशी उत्तम कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने संघाला चांगली सुरुवात करून दिली असली, तरी संघासाठी चांगली खेळी करू शकला नाही. 4 इनिंग्समध्ये रहाणेने 91 धावा केल्या. जिथे त्याचं अॅव्हरेज 21.50 एवढं होतं. भारतीय संघ निवड समितीचे माजी प्रमुख संदीप पाटील यांनी फलंदाजाला चांगलंच फैलावर घेतलं आहे. ते बोलताना म्हणाले की, 'ते फार उत्साहित होतात. अशातच संघाला अडचणींतून काढण्याऐवजी ते आणखी अडचणीत टाकतात.
संदिप पाटील यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'तुम्ही ऋषभला बढती देताय, पण याचदरम्यान तुम्ही साहाच्या भवितव्याशी खेळ करत आहात. यष्टीरक्षक म्हणून साहा हा माझी पहिली पसंती असेल. त्याच्याकडे अनुभव आहे. अनेकदा गरजेच्या वेळी त्याने संघाला मदत केली आहे. मग तुम्ही त्याचा आत्मविश्वास कमी का करत आहात? साहाची गुणवत्ता काय आहे, मला माहिती आहे. त्याने विंडीजमध्ये शतक झळकावलं त्यावेळी मी तिकडे होतो.'
संदिप पाटील यांनी बोलताना अजिंक्य रहाणेवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'या सीझनमध्ये जेव्हा ते मुंबईसाठी खेळत होते. त्यावेळी ते फार संथ गतीने खेळत होते. भारतीय संघासाठी विदेशात त्यांचा रेकॉर्ड फार उत्तम होता. परंतु, तो इतिहास आहे. आता त्यांना फक्त एक टेस्ट प्लेयर म्हणून ओळखलं जातं.' तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, 'जर तुम्हाला एवढचं हळू खेळायचं असेल आणि क्रिजवर कब्जा करून बसायचं असेल तर त्यापेक्षा एखाद्या सिक्युरिटी गार्डला बोलवावं.'
IND Vs NZ | न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवावर विराट कोहली म्हणतो...
भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील म्हणाले की, 'माझं असं म्हणणं नाही की, रहाणेने प्रत्येक बॉल खेळला पाहिजे, पण जेव्हा तुम्हाला शतक ठोकण्याची संधी असते आणि अशातच तुम्ही आउट होता, असा परफॉर्मन्स कोणालाच आवडत नाही. माझ्यासारखा सामान्य खेळाडू विदेशी ग्राऊंडवर खेळू शकतो, तर हे सर्व खेळाडू चॅम्पियन आहेत.'
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या ख्राईस्टचर्च कसोटीत भारताचा सात विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारताला 2-0 असा क्लीनस्वीप दिला. ख्राईस्टचर्चच्या हेग्ले ओवर मैदानात खेळवण्यात आलेला हा सामना अवघ्या तिसऱ्या दिवशीच संपला होता. या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 132 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. किवी संघाने हे लक्ष्य सात विकेट्स राखून पार केलं. यात सलामीवीर टॉम लॅथम (52 धावा) आणि टॉम ब्लण्डेल (55 धावा) यांनी महत्त्वपूर्व योगदान दिलं होतं.
संबंधित बातम्या :
Ind vs NZ, 2nd Test Day 3 | न्यूझीलंडचा भारताला क्लीनस्वीप, टीम इंडियाचा 7 विकेट्सनी पराभव
आधी अभ्यास करा, मग प्रश्न विचारा; न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर विराटने पत्रकाराला झापलं