एक्स्प्लोर
Paris Olympics 2024 :भारतानं 10 खेळाडूंसह खेळत इतिहास रचला, श्रीजेश द वॉलनं ब्रिटनला रोखलं, हॉकीच्या उपांत्य फेरीत धडक
India vs Great Britain : पॅरिस ऑलिम्पिकच्या हॉकी मध्ये भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ब्रिटनला पेनल्टी शुट आऊटमध्ये 4-2 असं पराभूत करत भारतानं विजय मिळवला.
भारतीय हॉकी संघ
1/5

भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील उपांत्य पूर्व फेरीचा सामना रोमांचक झाला. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंह यानं दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल भारताला आघाडी मिळवून दिलीहोती. त्यानंतर इंग्लंडच्या ली मॉर्टननं 27 व्या मिनिटाला गोल केला. यामुळं मॅचमध्ये दोन्ही संघांची बरोबरी झाली.
2/5

भारताचा खेळाडू अमित रोहितदास याला रेड कार्ड देण्यात आल्यानं भारताला तीन क्वार्टरमध्ये 10 खेळाडूंसह खेळावं लागलं.
3/5

भारतानं इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतानं ग्रेट ब्रिटनला 3-1 असं पराभूत केलं होतं.
4/5

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं पेनल्टी शुट आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव करत धुव्वा उडवला.
5/5

भारताचा गोलकीपर पी आर श्रीजेश यानं द वॉल बनत पेनल्टी शुट आऊटमध्ये इंग्लंडचे दोन गोल रोखले. भारताकडून हरमनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, ललित उपाध्याय आणि राजकुमार पालनं गोल करत भारताला उपांत्य फेरीत पोहोचवलं. आता भारतीय संघ यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे.
Published at : 04 Aug 2024 04:19 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























