एक्स्प्लोर
Vinesh Phogat Disqualified: एका दिवसात तीन कुस्त्या जिंकलेल्या विनेशचं नशीब रुसलं!
विनेश आज भारताला यंदाचं पहिलं सुवर्णपदक ही मिळवून देईल, अशी आशा प्रत्येक भारतीयाला होती.

vineshphogat/
1/11

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) इतिहास घडवला अन आजवरच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympics 2024) अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली.
2/11

विनेश आज भारताला यंदाचं पहिलं सुवर्णपदक ही मिळवून देईल, अशी आशा प्रत्येक भारतीयाला होती.
3/11

मात्र हा आनंद आजच्या सकाळने हिरावून घेतला. कारण कालच्या पेक्षा विनेशचे आजचे वनज 100 ग्रॅम जास्त आढळल्यानं, ऑलिम्पिकने तिला अपात्र ठरवले.
4/11

फक्त तिनंच नाहीतर, संपूर्ण भारतानं तिच्यासोबत गोल्ड जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण फक्त काहीशा ग्रॅम वजनामुळे तिच्या गोल्डन स्वप्नांचा पुरता चुरडा झाला आहे.
5/11

कोट्यवधी भारतीयांनी तिच्या सुवर्णभरारीसाठी प्रार्थना केल्या होत्या. पण तिच्यात आणि ध्येयामध्ये 50 ग्रॅम वजन आडवं आलं आणि होत्याचं नव्हतं झालं. भारताची धडाकेबाज कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) अपात्र घोषित करण्यात आलं. विनेशला अपात्र घोषित केल्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
6/11

विनेशनं 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. आज रात्री 10 वाजता फायनलचा सामना खेळवला जाणार होता.
7/11

सामन्यापूर्वी विनेशचं वजन करण्यात आलं, पण दुर्दैवानं तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरलं. वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित केलं असून आता तिचं सुवर्णभरारी घेण्याचं स्वप्न भंगलं आहे.
8/11

विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
9/11

स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
10/11

कुस्तीमध्ये, कोणत्याही कुस्तीपटूला फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची सूट मिळते. म्हणजेच, विनेशचं वजन 50 किलो 100 ग्रॅम असतं, तर ती सुवर्णपदकाची लढत खेळू शकली असती, पण तिचं वजन त्याव्यतिरिक्त आणखी 50 ग्रॅम जास्त होतं आणि त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
11/11

कुस्तीमध्ये कुस्तीच्या सामन्यांपूर्वी पैलवानांचे वजन केले जाते. याशिवाय कुस्तीपटूला त्याच श्रेणीत आपले वजन 2 दिवस राखायचे आहे परंतु विनेशला तसे करता आले नाही. रिपोर्ट्सनुसार, तिचं वजन 52 किलोपर्यंत पोहोचलं होतं, तिनं ते कमी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी ती अपयशी ठरली.
Published at : 07 Aug 2024 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion