Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Karjat Jamkhed Assembly Constituency : कर्जत जामखेडमध्ये अटीतटीने झालेल्या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी पराभव केला.
अहमदनगर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघाचा निकाल हाती आला असून रोहित पवारांना निसटता विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पवारांचा 1243 मतांनी पराभव झाला. त्यावर भाजपच्या राम शिंदे यांनी आक्षेप घेतला असून फेरमतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला पोस्टल मतांमध्ये रोहित पवारांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीने लढत सुरू असल्याचं दिसून आलं. कधी रोहित पवार पुढे तर कधी राम शिंदे पुढे अशी क्षणाक्षणाला अपडेट येत होती.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 2,60,380 इतकं मतदानं झालं होतं. कर्जत जामखेडमधील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 74.94 टक्के होती. कर्जत जामखेडमध्ये पुरुष मतदारांचं मतदान 1,39,033 इतकं मतदान झालं होतं. तर, महिला मतदाराच्या मतदानाची संख्या 1,21,347 इतकी होती. पोस्टल मतदानामध्ये रोहित पवार आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढाईत रोहित पवार यांनी बाजी मारली.
2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपाचे तत्कालीनं मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. रोहीत पवार यांनी तब्बल 43,347 मतांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. 25 वर्षापासून सत्ता असलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये रोहीत पवार यांनी भाजपचा दारुण पराभव केला होता. रोहित पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मतं मिळाली आहेत. तर राम शिंदे यांना 92 हजार 477 मतं मिळाली होती.