एक्स्प्लोर

Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव

Koregaon Assembly Elections 2024 : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यातील लढतीत महेश शिंदे यांनी बाजी मारली.

Koregaon Assembly Elections 2024 सातारा : सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ  मतदारसंघांपैकी कोरेगाव हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रचना पाहिली असता कोरेगाव आणि सातारा, खटाव तालुक्यातील काही गावांचा यामध्ये समावेश आहे. 2009 मध्ये विधानसभा पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे या मतदारसंघातून विजयी झाले. 2014 ला देखील त्यांनी विजय मिळवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले.  2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले आहेत. महेश शिंदे यांना 146166 मतं मिळाली. तर, शशिकांत शिंदे यांना  101103 मतं मिळाली. महेश शिंदे यांनी 45063 मतांनी विजय मिळवला. 

कोरेगावात दोन आमदारांमध्ये लढत

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे विजयी झाले. त्यानंतर काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदे यांना विधानपरिषदेवर घेतलं. त्यामुळं आता होणारी विधानसभा निवडणूक दोन्ही आमदारांमध्ये होणार आहे.  आमदार महेश शिंदे हे जून 2022 मध्ये  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावेळी  त्यांच्यासोबत होते.  दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवेळी  शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2024 च्या निवडणुकीत देखील शशिकांत शिंदे यांना महेश शिंदे यांच्या विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे.

लोकसभेला उदयनराजे भोसले यांना आघाडी

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे दोनवेळा आमदार राहिले आहेत. महेश शिंदे यांची आमदार म्हणून एक टर्म पूर्ण झाली आहे. आता दोन्ही नेते पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांसमोर जाणार आहेत. दोन्ही नेत्यांना कोरेगाव मतदारसंघात मोठा जनाधार असल्यानं 2019 ची विधानसभा निवडणूक अटीतटीची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. उदयनराजे भोसले यांना 103922 मतं मिळाली होती. तर, शशिकांत शिंदे यांना 97087 मतं मिळाली.  

कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा यापूर्वीचे आमदार

1972 : दत्ताजीराव बर्गे, अपक्ष
1978, 1980,1985, 1990, 1995 : शंकरराव जगताप,काँग्रेस
1999, 2004 : शालिनीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस 
2009, 2014 : शशिकांत शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेस 
2019 : महेश शिंदे , शिवसेना

2024 : महेश शिंदे , शिवेसना 

इतर बातम्या :

Karad South : कराड दक्षिणकडे संपूर्ण राज्याचं लक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हॅटट्रिकची संधी, भाजप अतुल भोसलेंना उतरवणार?

Man Vidhan Sabha Election 2024 : माणचा मानकरी कोण होणार? जयकुमार गोरेंविरोधात कोण लढणार? शरद पवारांच्या निर्णयावर मविआची रणनीती ठरणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 18 March 2025 : 9 PmNagpur Violance Ground Report : नागपूरमध्ये हिंसाचार, नागरिकांचं प्रचंड नुकसान; आजची स्थिती काय? पाहुया ग्राऊंड रिपोर्टJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर भरती? शैक्षणिक पात्रता काय? 18 March 2025Prashant Koratkar Lawyer PC : जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
Embed widget