एक्स्प्लोर
Mahashivratri 2023 : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
Mahashivratri 2023 Ambernath temple
1/10

आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह साजरा होत आहे. शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. .
2/10

आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
3/10

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात परंपरागत पुजाऱ्यांकडून रात्री 12 वाजता अभिषेक आणि आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. 24 तासात दीड ते दोन लाख भाविक दर्शन घेण्याची शक्यता.
4/10

अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे तब्बल 963 वर्ष जुनं असून शंकराचं हे अतिशय जागृत देवस्थान समजलं जातं.
5/10

दरवर्षी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी होते. लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. यावर्षी देखील मोठी गर्दी झाली आहे.
6/10

आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त मनोभावे पूजा करून यादिवशी उपवास करतात.
7/10

रात्री 12 वाजता जुन्या अंबरनाथ गावातील मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी महादेवाचा अभिषेक आणि आरती केली. यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं.
8/10

महाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख संपत्ती धन लाभते असे सांगितले जाते. आज देशभरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते.
9/10

महाशिवरात्री निमित्ताने राज्यातील सर्वच शिव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
10/10

महाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख संपत्ती धन लाभते असे सांगितले जाते. आज देशभरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते.
Published at : 18 Feb 2023 08:19 AM (IST)
आणखी पाहा






















