एक्स्प्लोर
Thane News : ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांचे 'देवा भाऊ' म्हणून झळकले बॅनर; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्येच श्रेय वादाची लढाई?
Thane News : शासनाने हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्याचे मान्य केलं आहे. अशातच सरकारने या मागण्या मान्य केल्याने ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवा भाऊ म्हणून बॅनर झळकले आहे.
Thane News
1/6

Maratha Reservation Thane News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस आमरण उपोषण केले. त्यांच्या या लढ्याला यश आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण देण्याची प्रमुख मागणीसह हैदराबाद आणि सातारा गॅझेटचीही मागणी त्यांनी केली होती. शासनाने हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्याचे मान्य केलं आहे.
2/6

अशातच सरकारने या मागण्या मान्य केल्याने ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवा भाऊ म्हणून बॅनर झळकले आहे.
3/6

मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले होते. अशातच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना शपत घेतली होती. मात्र आता युती सरकारमध्येच श्रेय वादाची लढाई सुरू झाली की काय? असा प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून दिसून येत आहे.
4/6

भाजपचे चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजी पाटील यांच्या वतीने भला मोठा बॅनर लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा भाजपचे बडे नेतेसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांचे देखील फोटो बॅनर वरती लावण्यात आले आहे.
5/6

कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असा बॅनरवर मजकूर लिहण्यात आला आहे. 'छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार. ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा, देवाभाऊ....' असंही त्यावर लिहलं आहे.
6/6

अशा प्रकारचा मजकूर बॅनरवरती लिहीत देवेंद्र फडणवीस यांना डिजिटल आणि वृत्तपत्राच्या जाहिरातीनंतर बॅनरवरती देखील झळकताना पाहायला मिळत आहे.
Published at : 06 Sep 2025 02:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























