एक्स्प्लोर
शहापूरमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग, 10 तास झाले तरी आगीवर नियंत्रण नाही
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव MIDC परिसरातील प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Fire News
1/10

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव MIDC परिसरातील प्लास्टिक कंपनीला भीषण आगलागली आहे
2/10

आग लागून तब्बल दहा तास उलटले तरी आग धुमसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे
3/10

शहापूर तालुक्यातील आसनगाव MIDC परिसरातील एस. के. आय. प्लास्टिक कंपनीला लागलेली भीषण आग दहा तास उलटूनही नियंत्रणात आलेली नाही.
4/10

सकाळी 11 वाजता लागलेली ही आग अजूनही धुमसत असून शहापूर, भिवंडी, कल्याण आणि जिंदाल येथील चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
5/10

प्लास्टिकचा मोठा साठा आणि उष्णतेमुळे आग आवरणे कठीण ठरत आहे. प्लास्टिक कंपनीला लागलेली आग बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे.
6/10

परंतु पूर्णपणे आग विझवण्यासाठी अजूनही काही वेळ लागू शकतो.
7/10

शहापूर परिसरात फायर स्टेशन नसल्याने आग विझवण्यात उशीर झाल्याची टीका होत असून, स्थानिकांकडून स्वतंत्र फायर स्टेशनची मागणी करण्यात येत आहे.
8/10

या कंपनीला लागलेली आग प्राथमिक अंदाजेत शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता वर्तवली जात असून, जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.
9/10

सकाळी 11 वाजता लागलेली ही आग अजूनही धुमसत असून शहापूर, भिवंडी, कल्याण आणि जिंदाल येथील चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
10/10

आग लागून तब्बल दहा तास उलटले तरी आग धुमसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे
Published at : 13 Oct 2025 09:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
भारत
























