Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
कर्जत जामखेडमधलं टर्फ वॉर थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पोहोचलं. आमदार रोहित पवारांच्या एका कार्यकर्त्याने विधान परिषदेला कमी लेखलं, सभापती राम शिंदे यांचीही हेटाळणी केली. त्याविरोधात प्रवीण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव आणला, या प्रस्तावाला अनिल परब, मिलिंद नार्वेकरांपासून शशिकांत शिंदेंपर्यंत सर्वांनी पाठींबा दिला. मात्र रोहित पवारांनी गल्लीतला वाद म्हणत पुन्हा हिणवलं. काय आहे वाद आणि काय आहेत त्यामागची कारणं पाहुयात हा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आजीमाजी आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील पराकोटीच्या संघर्षाचा तिसरा अंक सुरु झालाय...
पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सूर्यकांत मोरेंवर विधान परिषदेत आज हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला...
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात सभापती राम शिंदेंबाबत आक्षेपार्ह बोलणं सूर्यकांत मोरेंना महागात पडलं...
हे सूर्यकांत मोरे कधी काळी रामशिंदेंचे समर्थक होते पण सध्या ते आमदार रोहित पवारांचे कट्टर समर्थक आहेत...
ज्या भाषणात मोरेंनी राम शिंदेंच्या विधान परिषद सभापतीपदाची खिल्ली उडवली होती, त्यावेळी रोहित पवार सुद्धा उपस्थित होते याकडे काही सदस्यांनी लक्ष वेधलं...
सूर्यकांत मोरे पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, रोहित पवारांचे कट्टर समर्थक आहेत
जामखेड तालुक्यातील रत्नापूरचे माजी सरपंच आहेत
सूर्यकांत मोरे यांच्या पत्नी जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत
कर्जत-जामखेड या मतदारसंघात मोरे यांचा चांगला प्रभाव आहे
सूर्यकांत मोरे सातत्याने राम शिंदेवर टीका करण्यासाठी परिसरात प्रसिद्ध आहेत
दिवस सरता सरता आमदार रोहित पवारही यावर बोलले...
गल्लीतल्या भांडणाची विधान परिषदेत चर्चा होेते अशा भाषेत त्यांनी हेटाळणी केली..
या सगळ्या वादाला कर्जत-जामखेड मतदारसंघावरील वर्चस्वाचा संघर्ष कारणीभूत आहे.
कर्जत-जामखेडची लढाई
- २००९ आणि २०१४ साली राम शिंदे आमदार
- बारामतीच्या शेजारचा मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी संपर्क वाढवला
- २०१९ साली रोहित पवारांनी मंत्री राम शिंदेचा ४३ हजार मतांनी पराभव केला
- राम शिंदेंनी ५ वर्ष कसून मेहनत घेतली आणि चुका दुरुस्त केल्या
- विधान परिषदेचे आमदार असतानाही शिंदेंनी २०२४ साली विधानसभा लढवली
- रोहित पवार पुन्हा विजयी झाले, अवघ्या १२४३ मतांनी राम शिंदेंचा पराभव झाला
- आपल्या पराभवाला राम शिंदेंनी अजित पवारांना जबाबदार धरलं
महायुतीत असून अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये एकही सभा घेतली नाही
आणि पुतण्या रोहित पवारांना छुपी मदत केली असा आरोप राम शिंदेंनी केला होता
राम शिंदेंच्या आरोपांची पुष्टी प्रीती संगमावर पाहायला मिळाली, तिथे आपल्या मुळे वाचला अशा कोपरखळ्या अजित पवारांनी रोहित पवारांना मारल्या..
अशी सगळी पार्श्वभूमी असल्याने मोरेंनी केलेली हेटाळणी राम शिंदेंना जिव्हारी लागली नसती तरच नवल.
राम शिंदे आता राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती आहेत, त्यांच्या पदाबाबत अनुद्गार मोरेंना आणि त्यांचे नेते आमदार रोहित पवारांना महागात पडतात का.. की इतर असंख्य हक्कभंग प्रस्तावासारखा हा प्रस्ताव सुद्धा धूळ खात पडून राहतो याकडे आपलं लक्ष असेल
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर
All Shows

































