Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कॅश बॉम्ब टाकलाय. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात तीन व्हिडिओ आहेत. यामध्ये एका व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) दिसून येत आहे. तर इतर व्हिडिओपैकी एकात नोटांची बंडलं दिसत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर हा मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे, असा दावा महेंद्र दळवी यांनी केलाय. तर हा व्हिडीओ सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या माध्यमातून अंबादास दानवे यांना पाठवल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी केलाय. आता अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, माझ्याकडे या लोकांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने व्हिडिओ पाठवलेला आहे. मला माहिती नव्हतं, त्यात कोण आमदार आहे. तुम्ही नाव सांगितलेले आहे. त्यांच्यासारखा तो मला दिसतोय. समोरचा व्यक्ती कोण आहे याची देखील तपासणी झाली पाहिजे. धान्याची रास असते तशी नोटांच्या ढिगाची रास आहे. सामान्य माणसाने 50 हजार रुपये देखील बँकेत भरले तरी त्याला बँकेची नोटीस येते. इतक्या नोटांसंदर्भात हे महाशय कोणाशी बोलत आहे? आणि ती व्यक्ती कोण हे देखील समोर येईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाही. कॉन्ट्रॅक्टरचे बिल द्यायला सरकारकडे पैसे नाही. इतक्या नोटांचे ढीग या सत्ताधारी लोकांकडे आहेत हे मी जनतेसमोर आणलेले आहे. आधी देखील संजय शिरसाठ यांचा घरातला व्हिडिओ समोर आला होता. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी संपत्तीचा हैदोस घातला आहे तो मी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर आणले, असे त्यांनी म्हटले.
All Shows

































