Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर येतोय तो जरब अन धाक... मात्र, याच पोलिसांच्या खाकी वर्दी पलीकडचं एक संवेदनशील अन हळवं रूप अज अकोल्यात पाहायला मिळालंय... अकोला पोलिसांनी एका 15 वर्षांच्या चिमुकल्याला तब्बल 21 दिवसांनी त्याच्या आईच्या कुशीत सुखरूप पोहोचवलं. वडील रागावल्यामुळे घरून निघाल निघून गेलेल्या या चिमुकल्याला अकोला पोलिसांनी अनेक आव्हानांचा सामना करत शोधून काढलंय. त्याच्या शोधाची 'इनसाईड स्टोरी' अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहेय. पाहूयात, खाकी वर्दीतील जरबेच्या पलीकडे असलेलं अकोला पोलिसांचं संवेदनशील रूप...
व्हिओ 1 : मंडळी!, हे फक्त अश्रू नाहीत... तर हे आहेत एका आईचे आनंदाश्रू... हे अश्रूच नाहीतर हे आहे अश्रूंच्या रूपातून डोळ्यांतून वाहणारा आपला काळजाचा तुकडा परत मिळाल्याचा आनंद... आणि या माय-माऊलीच्या डोळ्यातील आनंदाश्रूंच्या पाठीमागे आहे अकोला पोलीस...अन या माय माऊलीच्या आनंदाश्रूंमागे आहेय अकोला पोलिसांची तब्बल 21 दिवसांची अपार मेहनत. तिच्या आनंदासाठी पोलिसांनी आकाश-पाताळ एक केलंय. अन जंग-जंग पछाडत तिचा मुलगा तिच्या कुशीत परत दिलाय. 21 दिवसानंतर आपल्या कुशीत आलेला आपल्या काळजाचा तुकडा पाहून त्या माऊलीला शब्दही फुटत नव्हतेय.
बाईट : उषा कनोजिया, मुलाची आई, अकोला.
व्हिओ 2 : हा आनंद आहेय खदान भागातील संतोष आणि उषा कनोजिया या माय-बापांचा... त्यांना दोन मुलं आहेयेत. त्यात मोठा ऋषीकेश नववीत शिकतोय.11 सप्टेंबरला ऋषिकेशवर एका छोट्या गोष्टीवरीन त्याचे वडील रागावले. वडिलांच्या बोलण्याचा राग धरून ऋषिकेश घरून निघून गेला... आणि त्याने थेट रेल्वे स्टेशन गाठत नागपूर-कोल्हापूर रेल्वे पकडलीय. त्यानंतर त्यांनी गेल्या 21 दिवसात तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम केलाय. गेल्या काही दिवसांपासून तो पंढरपुरात एका हॉटेलमध्ये काम करत होताय. या 21 दिवसात त्याच्या आई-वडिलांना प्रत्येक क्षण हा एखाद्या युगसारखा भासत होताय. त्यांनी तक्रार केल्यानंतर अकोल्याचा खदान पोलीस, पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दाखवलेली माणुसकी आणि आत्मीयता त्यांच्यासाठी शब्दांच्या पलीकडची आहेय. आज मुलगा आपल्यासमोर आल्यानंतर आई-वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला
All Shows

































