Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
दिवसभरातली सर्वोत मोठी बातमी आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिली ती ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी...अंबादास दानवेंनी एक आमदार आणि नोटांच्या बंडलांचा एक व्हिडीओ शेअर केला.. व्हिडीओमध्ये दिसणारे आमदार आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी... आता हा व्हिडीओ खरा आहे की खोटा हे शोधण्याचं काम पोलिसांचं आहे.. मात्र पोलिसांचा तपास सुरू होण्यापूर्वी अनेक नेत्यांनी आपआपलं लॉजिक वापरून त्या व्हिडीओचं अॅनालिसीस सुरू केलं... आणि मग सुरू झालं आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण...
माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेते नेते अंबादास दानवे मोबाईलमध्ये एवढं काय शोधण्याचा प्रयत्न करताहेत?
सापडली...
ती व्हिडीओ क्लिप अखेर सापडली.
याच व्हिडीओ क्लिपनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीय.
आता दानवेंच्या मोबाईलमधून झूम आऊट होऊन एका व्हिडीओ कॉलची ही क्लिप जरा बारकाईनं बघूयात..
((इथून दानवेंचे शॉट आऊट करून
मेन क्लिप इन करूयात. सुरूवातीला महेंद्र दळवी दाखवू नका))
नोटांचे हे बंडल पाहून कुणाचेही डोळे पांढरे होतील..
लाल टी शर्ट वाला एकामागे एक नोटांचं बंडल बाहेर काढतोय...
आता या क्लिपमधला हा चेहरा पाहिलात?
हे आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी...
आता आमदार महेंद्र दळवी आणि नोटांच्या बडलचं काय कनेक्शन असेल बरं?
असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही..
आणि हाच प्रश्न जन्माला घालण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी हा व्हिडीओ व्हायरल केलाय का?
थेट दानवेंनाच विचारूयात
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आमदार महेंद्र दळवींसह शिवसेनेला २२० व्होल्टचा झटका नक्की बसला असेल
मात्र दानवेंनी व्हिडीओ पाठवणाऱ्याबाबतची माहिती जाहीर केल्यानंतर ४४० व्होल्टचा शॉक बसला असण्याची जास्त शक्यता आहे
अंबादास दानवेंनी क्लू दिल्या दिल्या ,
शिंदेंच्या शिवसेनेचे कर्जतचे आमदार आणि महेंद्र दळवींचे जवळचे साथीदार महेंद्र थोरवे यांच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती आली..
ती म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
कुणी अजितदादांवर बोट उगारू दे किंवा सुनील तटकरेंवर...
राष्ट्रवादीच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यासाठी आमदार अमोल मिटकरी सदैव अग्रेसर असतात
मध्यंतरी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचाही पैशानं भरलेल्या बॅगेसह व्हिडीओ व्हायरल झाला होता..
आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर केलेला आरोप संजय शिरसाट यांना काही पटलेला नाही
त्यांनी व्हिडीओचं खापर सुनील तटकरेंऐवजी
एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डोक्यावर फोडलंय
आता तुम्ही म्हणाल की आमदार महेंद्र दळवी जे स्वतः व्हिडीओमध्ये दिसताहेत... त्यांचं म्हणणं काय आहे?
व्हिडीओ खरा निघाला तर राजकारण सोडण्याची तयारी महेंद्र दळवींनी दाखवलीय..
तसंच व्हिडीओमधला लाल टीशर्टवाला कोण आहे हे जगाला सांगावं... असं आवाहन त्यांनी अंबादास दानवेंना केलंय
महेंद्र दळवींचा हा कॉन्फिडन्स बघून त्यांचे जवळचे साथीदार आणि मंत्री भरत गोगावले अक्षरशः भारावून गेलेत
महेंद्र दळवी आणि नोटांच्या व्हिडीओवर बोट ठेवताना, ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसनं जुन्या व्हिडीओची उजळणी करण्याची संधी साधलीय
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हा व्हिडीओ विधीमंडळात आणि संसदेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली
भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणेंना या व्हिडीओपेक्षा ठाकरेंचं कर्जतमधील फार्महाऊस जास्त गंभीर वाटतंय
तर सुधीर मुनगंटीवारांनी मात्र व्हिडीओची गंभीर दखल घेत सभागृहाला परंपरेची आठवण करुन देण्याची तसदी घेतलीय
खरं तर काही सेकंदाची ही व्हिडीओ क्लिप
मात्र या क्लिपमध्ये सध्या महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण दडलंय
राजकारण म्हणजे खरंच पैशांचा खेळ आहे का? जनतेच्या मनात असा प्रश्न उपस्थित करण्याचं काम या क्लिपनं केलंय
या क्लिपनं दोन मित्र पक्षांमधला अविश्वास अधोरेखित केलाय
एकाच पक्षातील आमदारांचे पैशांसोबतचे व्हिडीओ व्हायरल होत असल्यानं, ही कुणाची राजकीय चाल आहे ?अशी शंकेची पाल चुकचुकण्याची संधी देखील या क्लिपनं दिलीय
आता या क्लिपचं सत्य महाराष्ट्राला कळणार का? की राजकीय सोयीनुसार तिचा वापर केला जाणार?
कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा संभाजीनगर
All Shows

































