एक्स्प्लोर
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ओळख असणारे आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचे चिरंजीव सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.
Soham and pooja reception uddhav Thackeray
1/7

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ओळख असणारे आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचे चिरंजीव सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.
2/7

बांदेकर घराण्याचां लेक अन् सुनेच्या लग्नसोहळ्यानिमित्त आज मुंबईत सोहम आणि पूजाचा आनंद सोहळा सुरू आहे. या रिसेपशनसाठी दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली आहे.
3/7

सोहम अन् पुजाच्या या रिसेप्शन सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक हजेरी लावली. यासह, शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत हेही उपस्थित होते.
4/7

पोलीस महानिरीक्षक आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनीही सोहम अन् पुजाच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावत दोन्ही कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या
5/7

दरम्यान, सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. पूजा आणि सोहम यांनी लोणावळ्यात कुटुंबीय, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
6/7

गेल्या बऱ्याच दिवसांपासून बांदेकरांच्या होणार्या सुनेची चर्चा संपूर्ण सिनेसृष्टीत रंगलेली. त्यावेळी पूजा बिरारीचं नाव समोर आलेलं, पण ना बांदेकर कुटुंबीय कुणाला काही सांगत होते, ना बिरारी कुटुंबीय. अखेर शुभ मंगल सावधान झालं.
7/7

पूजा बिरारी मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक. ‘स्वाभिमान’, ‘साजणा’पासून ते सध्या स्टार प्रवाहवरील गाजणारी मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ या सर्वांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकल आहे.
Published at : 09 Dec 2025 09:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























