इंधन दरवाढ आणि कोरोना काळात आर्थिक नुकसान म्हणून अनेकजण गाडी बाईक खरेदी करताना खुप विचार करत आहेत. गरज आहे पण चांगला मायलेज देणारी आणि तुलनेने स्वस्त बाईक घेण्याला अनेकांचा प्राधान्य आहे. आज अशाच काही बाईक्स पाहुयात.
2/5
(Hero Splender i-smart) हीरो स्प्लेंडर आय स्मार्ट बाईकचा लुक आकर्षक आहे. या बाईकमध्ये 113 सीसी इंजिन, डिस्क ब्रेक, अॅलोय व्हील्स मिळत आहेत. बीएस -6 तंत्रज्ञानाची ही बाईक 55 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देण्यास सक्षम आहे. हीरोच्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे.
3/5
(Bajaj Pulser 125 Neon) बजाजच्या या बाईक लूक अतिशय स्टायलिश आणि दमदार आहे. बजाज पल्सर 125 निऑन बाईकमध्ये 125 सीसी इंजिन, डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर्स आहेत. मायलेजच्या बाबतीतही ती खूप चांगली आहे. पल्सर 125 निऑन बाईक 52 किलोमीटरचा मायलेज देऊ शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 80 हजार रुपये आहे.
4/5
(Honda Livo) होंडाची ही बाईक लेटेस्ट फीचर्ससह सज्ज असून मायलेजसाठी खूप चांगली आहे. फीचर्सविषयी बोलायचं तर या बाईकमध्ये 109 सीसी इंजिन, 4-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन मिळत आहे. सुरक्षेसाठी ड्रम ब्रेक आहेत. अॅलोय व्हील्ससह होंडा लिव्हो बाइक 60 किमी प्रतिलिटर मायलेज देऊ शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 72 हजार रुपये आहे.
5/5
(TVS Star City Plus) टीव्हीएस बाईक बर्याचदा चांगल्या माइलेजमुळे पसंत केल्या जातात. टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाईक लेटेस्ट बीएस -6 इंजिनसह सुसज्ज आहे. तसेच यात 109 सीसी इंजिन आणि 4-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आहे. मायलेजबद्दल बोलायचं तर ही बाईक 70 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देऊ शकते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे.