एक्स्प्लोर
AC वापरणाऱ्यांनी खबरदारी घ्या! स्फोट होण्याचे आधीचे संकेत ओळखा
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण घरी एअर कन्डिशनर म्हणजे एसीचा वापर करतो. मात्र आता एसीमध्ये स्फोट होण्याची जाणवत आहेत.
घरातील AC चा स्फोट होण्यापूर्वी मिळतात 'हे'5 मोठे संकेत.
1/7

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण घरी एअर कन्डिशनर म्हणजे एसीचा वापर करतो. मात्र आता एसीमध्ये स्फोट होण्याची जाणवत आहेत.
2/7

एसी फुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की मेंटेनन्स वेळेवर न होणे, नीट साफसफाई न करणे, शॉर्ट सर्किट.
3/7

एसीचा स्फोट होण्यापूर्वी त्याचे काही संकेत मिळत असतात. त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम स्फोटामध्ये होऊन आपले आर्थिक नुकसान होऊ शकतं.
4/7

एसीमध्ये काही बिघाड असल्यास त्यातून आवाज येतो. बरेच लोक या गोष्टीकडे गांभीर्याने घेत नाहीत आणि दुर्लक्ष करतात. पण असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही मेकॅनिकला बोलावून एसी तपासावा.
5/7

अनेक वेळा असे दिसून आले आहे की एसी जास्त चालल्याने त्यातून थंड हवा कमी येते. यामागचे कारण फॅन खराब होणे किंवा वायरिंगमध्ये काही समस्या असू शकते. त्याचा प्रभाव कंप्रेसरवरही जाणवतो.
6/7

लोकांच्या सोयीसाठी एसीमध्ये अनेक मोड दिलेले असतात. त्यामध्ये फॅन मोड, कूल मोड, ड्राय मोड, एनर्जी सेव्हिंग मोड इत्यादींचा समावेश आहे. ते रिमोट कंट्रोलच्या मदतीने बदलता येऊ शकते. परंतु जर तुम्हाला मोड बदलण्यात अडचण येत असेल तर त्याची तपासणी करणे योग्य ठरेल. सेन्सरच्या खराबीमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
7/7

जर तुमच्या एसीटी बॉडी पूर्वीपेक्षा जास्त गरम होत असेल तेव्हा समजून घ्या की तुमच्या एसीमध्ये काही समस्या आहे आणि ती मेकॅनिकला दाखवणे आवश्यक आहे.
Published at : 24 Sep 2025 04:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
























