एक्स्प्लोर
PHOTO : पुणे रेल्वे स्टेशनसमोरील भुयारी मार्गातील 40 दुकानांमध्ये पाणी भरलं
पुण्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या भुयारी मार्गातील 40 दुकानांमध्ये पाणी भरलं. या ठिकाणी मिठाई, मोबाईल फोन, कपड्यांची अनेक दुकान आहेत.

Pune Railway Station Underground Waterlogging
1/9

पुण्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या भुयारी मार्गात 40 दुकानांमध्ये पाणी भरलं आहे.
2/9

या ठिकाणी मिठाई, मोबाईल फोन, कपड्यांची दुकान आहेत त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
3/9

दिवाळीनिमित्ताने या दुकानदारांनी माल भरला होता.
4/9

अनेक प्रवासी आपल्या गावाला जाताना याच दुकानांमधून दिवाळीची मिठाई आपल्या घरी घेऊन जायचे.
5/9

परंतु काल रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या दुकानांमध्ये 6 ते 7 फूट इतके पाणी भरलं आणि आज सगळं होतं तर नव्हतं झालं.
6/9

इथल्या दुकानदारांनी महानगरपालिकेला वारंवार यासंदर्भात तक्रारी दिल्या होत्या.
7/9

मात्र पालिकेने कधीही याबाबत दखल घेतली नाही आणि त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
8/9

या सगळ्या परिस्थितीला पूर्ण जबाबदार महापालिका आहे त्यांनी आम्हाला भरपाई द्यावी अशी सुद्धा मागणी या दुकानदारांनी केली आहे.
9/9

पुण्यात काल 105 मिलीमीटर पाऊस दोन ते अडीच तासात पडला.
Published at : 18 Oct 2022 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
लातूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
