एक्स्प्लोर
गायकवाडांची लेक झाली खुटवडांची सून; थाटामाटात, धुमधडाक्यात पार पडला प्राजक्ता-शंभुराजचा राजेशाही विवाहसोहळा, PHOTOs
Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Marriage: सध्या मनोरंजन विश्वास सनई-चौघड्यांचे सूर वाजतायत. शुभ मुहूर्तावर चाहत्यांचे लाडके कलाकार आपली लग्नगाठ बांधतायत.
Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Marriage
1/10

Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Marriage: सध्या मनोरंजन विश्वास सनई-चौघड्यांचे सूर वाजतायत. शुभ मुहूर्तावर चाहत्यांचे लाडके कलाकार आपली लग्नगाठ बांधत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकलेत.
2/10

2 डिसेंबर 2025 रोजी 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाड हिनं उद्योगपती शंभुराज खुटवडशी लग्न केलंय. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड खुटवड घराण्याची सून झाली आहे.
3/10

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं आजवर अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलंय. पण तिला खरी ओळख मिळाली ती 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे.
4/10

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत प्राजक्ता गायकवाडनं छत्रपती शंभू राजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलेली. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्रानं युवराज्ञी म्हणून तिला डोक्यावर घेतलेलं.
5/10

अशातच आता प्राजक्तानं खऱ्या आयुष्यातही शंभुराज शोधलेत. प्राजक्ता आणि शंभुराज यांचा विवाहसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला.
6/10

प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या शाही विवाहसोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
7/10

प्राजक्तानं आपल्या लग्नसोहळ्यासाठी हटके लूक केलेला. तिनं हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. त्यासोबतच तिनं भरजरी सोन्याचे दागिने परिधान केलेलं. त्यासोबतच ट्रेंडी नथ आणि मुंडावळ्यांसोबत प्राजक्तानं आपला लूक कम्प्लीट केलेला.
8/10

तर, शंभुराजनं पांढऱ्या रंगाची शेरवानी, डोक्यावर फेटा असा राजेशाही लूक केलेला. प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या डोळे दिपवणारा लग्नसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला.
9/10

प्राजक्ताच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
10/10

प्राजक्ताच्या गळ्यात शंभुराजचा मंगळसूत्र घालतानाचा व्हिडीओही व्हायरल होतोय, त्यामध्ये प्राजक्ताच्या क्लासी मंगळसुत्रानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
Published at : 03 Dec 2025 06:35 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























