एक्स्प्लोर
Pune NCP Protest : एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने एप्रिल फुल आंदोलन
भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे.

pune ncp
1/8

भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे.
2/8

हा फसवा विकास म्हणजेच मोदी विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस 1 एप्रिल म्हणजेच "एप्रिल फुल" या दिवशी साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने आज डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं.
3/8

यावेळी मोदी वाढदिवसाचा केकदेखील कापण्यात आला.
4/8

दरवर्षी देशात दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार, वेदांत फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार, पेट्रोल - डिझेल दरवाढ कमी करणार, महागाई कमी करणार अशी आश्वासनं दिली होती.
5/8

प्रत्येक नागरीकाला पंधरा लाख रुपये देणार अशा अनेक खोट्या घोषणा मोदी यांनी निवडणूकीपूर्वी केल्या.
6/8

परंतु यातील एकही घोषणा त्यांनी पुर्ण केली नाही याचा यावेळी निषेध करण्यात आला.
7/8

आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक प्रदेश कार्याध्यक्ष राकेश कामठे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर,अभिषेक बोके,मयूर गायकवाड उपस्थित होते.
8/8

यावेळी सरकारविरोधात घोषणाही देण्यात आल्या.
Published at : 02 Apr 2023 12:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धुळे
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
