एक्स्प्लोर
Navratri 2022 : राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळानं साकारलं 'स्वप्नलोक'
दरवर्षी विविध थीमवर आधारीत देखावे साकारणाऱ्या लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी शरद ऋतूच्या संकल्पनेवर आधारीत 'स्वप्नलोक' साकारले आहे.
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी शरद ऋतूच्या संकल्पनेवर आधारीत 'स्वप्नलोक' साकारले आहे.
1/10

शरद ऋतूच्या संकल्पनेवर कालियागंज येथील आर्टिस्ट निहार देबनाथ यांच्या कल्पकतेतून 'स्वप्नलोक' हा देखावा साकारण्यात आला आहे.
2/10

लक्ष्मीनगर व्हॉलिबॉल ग्राऊंड येथे आयोजित नवरात्र उत्सवात यंदा महिषासुरमर्दिनी स्वरुपातील दुर्गा माता विराजमान आहे.
3/10

प्रदूषणरुपी महिषासुराचे मर्दन करणारी महिषासुरमर्दिनी, अशी या देखाव्याची थीम आहे. गेल्या 16 वर्षांपासून मंडळाच्यावतीने विविध थीमवर आधारीत सुंदर देखावे साकारण्यात येत असतात.
4/10

देवीच्या दर्शनास मंडपात शिरताच भाविकांना स्वर्गलोकात प्रवेश केल्याचा भास होतो.
5/10

या देखाव्यासाठी 18 कलावंत सलग साडेचार महिने परिश्रम घेत होते.
6/10

देखाव्याची संपूर्ण संकल्पना निहार देबनाथ यांचीच असून अडीच महिने कालियागंज येथेच देखाव्याचा संपूर्ण पायाभूत ढाचा तयार करण्यात आला आणि त्यानंतर हा ढाचा ट्रान्सपोर्टद्वारे नागपुरात आणण्यात आला.
7/10

हा संपूर्ण देखावा इन्स्टॉल करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागल्याचे निहार देबनाथ यांनी सांगितले.
8/10

मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वैशिष्ट्यपूर्ण चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यंदा लडाख ते कन्याकुमारी असा संपूर्ण भारत आपल्या सेवा कार्याने व्यापणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्याची गाथा सचित्र दर्शनाद्वारे मांडण्यात आली आहे.
9/10

मंडळाच्यावतीने यंदा निमंत्रण असलेल्या पास धारकांसाठी मुंबई येथील लाईव बॅन्डचीही व्यवस्था असून फक्त निमंत्रितांसाठी गरबा खेळण्याची सोयही करण्यात आली आहे.
10/10

मंडळाच्यावतीने यापूर्वी चंद्रायाण, सबमरिन, नागपूर मेट्रो, विवेकानंद मेमोरियल आदी सुंदर देखावे नागपुरकरांसाठी आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी साकारण्यात येणाऱ्या आपल्या नवीन संकल्पनेमुळे हा मंडळ शहरात प्रसिद्ध आहे.
Published at : 28 Sep 2022 10:54 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
भारत























