एक्स्प्लोर
Nagpur Crime: नागपूरच्या बॉडीबिल्डिंग क्षेत्रात दबदबा, जीममध्ये प्रोटीन्स विकता-विकता ड्रग्जच्या विळख्यात सापडला, माजी नगरसेवकाच्या लेकाला बेड्या
Nagpur Crime News : नागपूरच्या गुन्हेगारी (Nagpur Crime) विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरातील माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडीची तस्करी (MD Drugs) करताना पोलिसांनी अटक केली आहे.
Nagpur Crime News
1/6

नागपूरच्या गुन्हेगारी (Nagpur Crime) आणि राजकीय वर्तुळातून(Nagpur Crime) एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरातील माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडीची तस्करी करताना पोलिसांनी अटक केली आहे.
2/6

माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार (Sanket Buggewar) याला एमडी तस्करी करताना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांना त्याच्याकडून 16.07 ग्राम एमडी पावडर आढळली असून जवळपास 1.67 लाख रुपयाच्या एमडी पावडरसह 18.17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
3/6

पुढे आलेल्या माहितीनुसार, संकेत बुगेवार हा नागपूरचे भाजपचे माजी नगरसेवक अजय बुगेवार यांचा मुलगा आहे.
4/6

संकेत जिम ट्रेनर असून स्वतः बॉडी बिल्डिंग ही करतो. सोबतच संकेतने नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्ली येथे बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि मिस्टर इंडिया हे शीर्षक आपल्या नावे केले होते.
5/6

संकेत जिम ट्रेनर असल्याने जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांना व्हिटॅमिन सप्लिमेंट्सची विक्री ही करत होता. मात्र, तो एम डी ड्रग तस्करी कडे कसा वळला याचा तपास पोलीस करत आहे.
6/6

पोलिसांनी संकेतला अटक केली तेव्हा तो एमडी या अमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी जात असल्याचा आरोप आहे. आरोपी संकेत हा गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हेडाऊ रेस्टॉरंटजवळ येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी शनिवारी रात्रीपासूनच सापळा रचत अटक केली आहे.
Published at : 14 Jul 2025 09:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
भारत


















