Maharashtra Live: पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड; हॉस्पिटलच्या हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: आज सकाळी अकरा वाजल्यापासून अलिबागच्या नागावमध्ये बिबटयाची दहशत कायम आहे.आतापर्यंत या बिबटयाने पाच जणांना जखमी केल्याची माहिती समोर आलीय.यामध्ये तीन स्थानिक ग्रामस्थ, एक वनअधिकारी आणि एक बचाव पथकातील सदस्याचा समावेश आहे. जखमींना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बिबटयाला पकडण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच असून पुण्याहून रेस्क्यू पथक आणि कोलाड सह्याद्री रेस्क्यू टीम आणि वनविभागाचे अधिकारी या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागाव मध्ये दहशतीचा वातावरण तयार झाल्याने जो पर्यंत बिबट्या हातात लागत नाही तोपर्यंत नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय उद्या येथील सर्व शाळा देखील बंद ठेवण्यात आल्यात.
परभणीत मंत्री नितेश राणेच्या निषेधासाठी जमलेल्या SDPI संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
भाजपचे नेते तथा मंत्री नितेश राणे आज परभणी दौऱ्यावर होते जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी या गावात भेट दिल्यानंतर त्यांनी परभणी शहरातील प्रभावती नगर मध्ये एका ठिकाणी सदिच्छा भेट दिली आहे यानंतर परतत असताना शहरातील रायगड कॉर्नर परिसरामध्ये SDPI पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या निषेधासाठी थांबले होते निषेध करण्या अगोदरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.रायगड कॉर्नर परिसरातील डियेड कॉलेजच्या मैदानामध्ये हे कार्यकर्ते जमले होते आम्हाला आंदोलन करू द्या त्यांनतर ताब्यात घ्या असे ते पोलिसांना म्हणत आहेत यावरून त्यांची किरकोळ बाचाबाची ही झाल्याचे पाहायला मिळाले नितेश राणे मात्र निघून गेले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सही घोटाळ्यानंतर आता तहसीलदारांची ही बनावट सहीचा प्रकार उघड; केज तहसीलदारांच्या सहीने काढले पाच क्षेत्र दुरुस्तीचे आदेश
केज : बीड जिल्हाधिकारी यांच्या बनावट सह्या करून कोट्यावधी रुपयाचे शासनाची फसवणूक करण्याचे प्रकरण ताजे असताना आता चक्क महसूल विभागात आता नवा घोटाळा समोर आला आहे. केजमध्ये थेट तहसीलदारांच्या बनावट सही करून पाच क्षेत्र दुरुस्तीचे आदेश काढल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर तहसिलदार राकेश गिड्ढे यांनी प्राथमिक चौकशी करुन अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे. यामध्ये सह्या बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला असून या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.























