एक्स्प्लोर
Bachchu Kadu: शेतकरी कर्जमुक्त आंदोलन तापलं, बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर रात्री रस्त्यावरच झोपले, महामार्ग रोखल्याने कोंडी
Bachchu Kadu: कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलन महामार्ग रोखून बसले आहे. आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे.
Bachchu Kadu
1/9

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी , वामनराव चटप , मा. मंत्री महादेव जानकर नागपूर येथे आंदोलनस्थळी शेतऱ्यांच्यासोबत रात्रभर रस्त्यावरच झोपले.
2/9

बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच आहे. महामार्ग अजूनही रोखून धरले आहे, कालची रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढली आहे.
3/9

कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलन महामार्ग रोखून बसले आहे. आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे.
4/9

आमची चर्चेची तयारी आहे.चर्चेचे दार आम्ही बंद नाही केले, ते सरकारने बंद केले आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर रेल्वे रोखून दाखवू असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
5/9

बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कालची रात्र जामठा स्टेडियम जवळ महामार्गावरच झोपून काढली आहे अजूनही बच्चू कडू यांच्यासोबत शेकडो आंदोलन महामार्गावर बसून आहेत त्यामुळे नागपूर वर्धा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
6/9

शिवाय जामठा येथून जाणाऱ्या जबलपूर हैदराबाद महामार्गावर ही आंदोलन बसल्याने काही अंशी त्या ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली आहे.
7/9

लोकांची कोंडी होत असली तरी शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे त्याचं काय असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. चर्चेसाठी कृषिमंत्री महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री कोणी यावं अशी आमची अपेक्षा नाही.
8/9

मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे कर्जमाफी मिळावी ही अपेक्षा असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
9/9

नागपूर - वर्धा आणि जबलपूर - हैदराबाद महामार्ग बच्चू कडू यांच्या सोबत दाखल झालेल्या आंदोलकांनी रोखून धरल्याने दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनेक किमी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे
Published at : 29 Oct 2025 07:53 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























