एक्स्प्लोर
दिव्याच्या घरी जाऊन सरन्यायाधीशांची शाबासकी, राज्य सरकारनेही केला सन्मान; बुद्धीबळपटूला किती कोटी मिळाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2025 ची FIDE महिला विश्वचषक विजेती प्रथम भारतीय महिला, ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख यांचा भव्य 'नागरी सन्मान सोहळा' आज नागपूर येथे संपन्न झाला.
CJI honored divya deshmukh and devendra Fadnavis
1/8

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2025 ची FIDE महिला विश्वचषक विजेती प्रथम भारतीय महिला, ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख यांचा भव्य 'नागरी सन्मान सोहळा' आज नागपूर येथे संपन्न झाला.
2/8

नागपूरमधील या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. परिणय फुके व इतर मान्यवर उपस्थित होते.
3/8

राज्य सरकारच्यावतीने नागपूरकन्या आणि महाराष्ट्रकन्या म्हणून दिव्याचा सत्कार करत तिला 3 कोटी रुपयांचे पारितोषिकही देण्यात आले. यावेळी, दिव्यामुळे महाराष्ट्राची, देशाची मान जगभरात उंचावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
4/8

दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखच्या बुद्धीबळातील सुवर्ण विजयाचे कौतुक केले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दिव्याकडून सर्वांना प्रेरणा मिळाली, यासाठी तिचा नागरी सत्कार करण्याचे आयोजन केले.
5/8

दिव्यामुळे कॅबिनेट बैठकीत आमचा सन्मान होतो, दिव्याच्या अभिनंदनाचा ठराव घेताना छगन भुजबळ म्हणाले होते, नागपूरचे लोक बुद्धिबळात फार हुशार आहे, ते जास्तच बुद्धीमान दिसतात. मात्र, आम्ही राजकारणात बुद्धीबळ खेळतो, चेकमेट पण करतो, अशी मिश्कील टिपण्णी मुख्यमंत्री फडणवीसांनी केली.
6/8

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बुद्धीबळ विश्व विजेती दिव्या देशमुख हिच्या नागपूरमधील शंकरनगर येथील घरी जाऊन तिला शुभेच्छा देत शाबासकी दिली.
7/8

आमचे तीन पिढ्यापासूनचे कौटुंबिक नाते आहे, दिव्याचा विजय हा कौटुंबिक आनंदाचा क्षण आहे, अशी भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केली.
8/8

दिव्याने यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला. अवघ्या 19 व्या वर्षी ही दैदीप्यमान कामगिरी बजावत तिने इतिहास घडवला.
Published at : 02 Aug 2025 06:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग













