एक्स्प्लोर
बच्चू कडूंच्या आंदोलन चिघळलं; आंदोलकांनी टायर पेटवुन समृद्धी महामार्ग रोखला, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Bacchu Kadu Farmer Protest: नागपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. अशातच या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे.
Bacchu Kadu Farmer Protest
1/7

नागपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. अशातच या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत.
2/7

'भलेही तुम्ही कर्जमाफी नंतर करा पण त्याचा जीआर तरी आज काढा', अशी आग्रही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. गेल्या वीस तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागपूरच्या महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव, उसाची एफआरपी, दुधाचे दर आणि सातबारा कोरा करणे यासह शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ आणि दिव्यांगांच्या एकूण २२ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
Published at : 29 Oct 2025 03:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























